जत नगरपालिकेत सत्ता स्थापनेचा गुंता कायम चर्चेच्या फेऱ्या सुरू : सत्तेत कॉग्रेस-राष्ट्रवादी की भाजप-राष्ट्रवादी ?

0

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही.  त्यामुळे त्रिशंकू अवस्था झाली आहे.  तर सत्ता स्थापनेचा गुंताही कायम आहे. 

पालिकेत कॉग्रेस-राष्ट्रवादी का भाजप-राष्ट्रवादी सत्तेत बसणार यावर वेगवेगळे तर्क लढविले जात आहेत. राष्ट्रवादी व कॉग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बेठका झाल्या आहेत.  राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आमदार जयंत पाटील व सुरेश शिंदे यांच्यात बैठक झाली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वाधिकार जतचे नेते माजी सभापती सुरेश शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे शिंदे यांची काय भुमिका असेल यावर सत्तेतील चित्र स्पष्ट होणार आहे. 

कॉग्रेसकडूनही सत्ता स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजपही सत्ता स्थापनेचा दावा करत आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या मागण्या मान्य करणाऱ्यांना पांठिबा मिळेल असा काहीसा मतप्रवाह राष्ट्रवादीच्या गोटातून बाहेर येत आहे.

Rate Card

 ऩिवडणूकीत कॉग्रेसच्या थेट नगराध्यक्ष निवडणून आल्या आहेत. मात्र त्यांच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर युती करून ते सत्ता आणण्याच्या प्रयत्नात आहेत. 

दुसरीकडे भाजपचे आमदार विलासराव जगताप यांच्याकडे सात नगरसेवकाचे संख्याबंळ आहे. त्यामुळे तेही सत्तेत जाण्याच्या प्रयत्नात आहेत. तिसरीकडे सहा जागा जिंकत किंगमेकर ठरलेले राष्ट्रवादीचे नेते माजी सभापती सुरेश शिंदे यांनी मागण्या मान्य करणाऱ्यांना पांठिबा अशी भुमिका घेतल्याने सत्ता स्थापनेचा गुंता कायम आहे. ता 20 डिंसेबरला नवे नगरमंडळ व नगराध्यक्ष पदभार स्विकारणार आहेत. त्यामुळे चर्चा गतीने सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.