राजकीय वादातून तिघावर हल्ला जतमधील घटना : तिघे जखमी, वृध्दा गंभीर : परस्पर विरोधी तक्रारी दाखल

0
7

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीच्या मते टाकण्यावरून झालेल्या वादातून शहरालगतच्या पवारवाडी येथे दगड,काठ्यांनी दोन महिला व कॉलेज तरूणावर पाचजणांनी दगड,काठ्यांनी मारहाण करण्यात आली. गंभीर मारहाणीत गौराबाई यशवंत सोलनकर,वय-60,रा. सोरडी ता.जत यांचा पाय मोडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत जत पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

अचानक झालेल्या मारहाणीत गौराबाई सह मनिषा अनिल व्हनमाने व दिपक अनिल व्हनमाने हा अभियात्रिंकी कॉलेजमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी जखमी झाला आहे. याबाबतची प्रकाश कृष्णा व्हनमाने, योगेश कृष्णा व्हनमाने, धनाजी कृष्णा व्हनमाने, अनिकेत धनाजी व्हनमाने व बजरंग कृष्णा व्हनमाने या पाचजणां विरोधात जखमी गौराबाई सोनलकर यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, गौराबाई या मुलगी मनिषा अनिल व्हनमाने यांच्याकडे शहरालगतच्या पवारवाडी येथे कामानिमित्त आल्या होत्या. शुक्रवारी सकाळी तानाजी कृष्णा व्हनमाने यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू होती. त्यावेळी मनिषा व त्यांचा मुलगा दिपक हे ऊसतोड कामगारांकडून ऊसाचे वाडे विकत घेऊन घरी येत होते. त्यामुळे वरील पाचजणांनी तुम्ही आमच्या शेतात का आला?असा जाब विचारत दगड व काठ्यांनी मारहाण केली.दरम्यान घरात बसलेल्या गौराबाई भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्थी करत असताना त्यांनाही काठीने मारहाण केली. त्यात त्यांचा उजवा पाय मोडला आहे. त्यांच्यावर जतमधील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान धनाज व्हनमाने यांनी मनिषा व दिपक यांनी मारहाण केल्याची तक्रार जत पोलिसात दिली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पांडूरंग मळगे म्हणाले,नगरपालिका निवडणूकीत प्रकाश व्हनमाने यांच्या पत्नी पराभूत झाल्या आहेत. त्याचा राग मनात धरून व्हनमाने कडून असे प्रकार घडत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

चौकट 

जत नगरपालिकेच्या निवडणूकीत अनेक उमेदवारांचा पराभव झाला आहे. काही पराभूत उमेदवारांकडून पराभवाला मतदारांना जबाबदार धरत धमकाविण़्याचे प्रकार सुरू आहेत. आमच्या कानावर काही घटना आल्या आहेत. असे कृत्य चुकीचे आहे. मते कुणाला टाकायचे यांचा अधिकार मतदारांचा आहे. त्यामुळे त्यांच्या दबाव टाकून दहशत माजविण़्याचा प्रकार घडल्यास कठोर कारवाई केली जाईल. कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये,तसे झाल्यास कायद्याच्या भाषेत कारवाई करू 

राजू तहसिलदार, पोलिस निरिक्षक 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here