बोर्गीतील जि.प. शाळेचे टाळे काढले उशिरा का होईना पण; प्रशासनाला आली जाग

0

उमदी,वार्ताहर: बोर्गी( ता.जत) येथील जि. प.कन्नड प्राथ. शाळेतील सहशिक्षक उमेश कोट्याळ यांच्या मनमानीस कंटाळून येथील ग्रामस्थ व पालकांनी घातलेले शाळेचे टाळे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब जगधने यांच्या आश्वासनानंतर काढण्यात आले.

     बोर्गी येथील जि.प.शिक्षक उमेश कोट्याळ हा मनमानी कारभार करत शाळेला उशिरा येणे ,शाळेला सतत गैरहजर राहणे,पालकांना उध्दट व आरेरावेची भाषा करत होता.याविरोधात येथील पालकांनी वारंवार जि. प. शिक्षण विभागाकडे तक्रार केल्या होत्या,परंतु वरीष्ठ अाधिकाऱ्यांनी काहीच दखल न घेतल्याने संतप्त पालकांनी शाळेला टाळेच ठोकले होते.शुक्रवारी गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब जगधने यांनी शाळेस भेट दिली.पालकांच्या समस्या ऐकून घेतल्या,संबधित शिक्षकावर कारवाई करण्याचे आश्वासन देत याबाबत वरिष्ठाकडे अहवाल सादर करण्यात येईल.कोट्याळ या शिक्षकास उद्यापासून तुमच्या शाळकडेे न  पाठवता जि.प.कडे पाठवण्यात येईल.अशा प्रकारचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी जगधने यांनी दिल्याने त्यांच्या उपस्थितीत शाळेस ठोकलेले टाळे काढले.

Rate Card

   

बोर्गी येथे शाळेस कुलूप बंद अंदोलन गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब जगधने यांच्या आश्वासन नंतर मागे घेऊन कुलपे काढण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.