शेगाव,वार्ताहर :शेगाव(ता.जत)येथील मुख्य बाजारपेठेतील सात दुकानावर शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी डल्ला लाखो रूपयाचा ऐवज लंपास केला. मध्यवस्तीतील बाजार पेठेत चोरीच्या घटनेने नागरिकात भितीचे वातावरण आहे. काही दुकानाचे दरवाज्याचे तोडण्याचे प्रकार घडले आहेत.
घटनेत आबासाहेब शिंदे यांच्या साई टेशनरी दुकानातील रोख रक्कम 2 हाजार,राहूल ताटे यांच्या भैरवनाथ मेडिकल मधील दोन हाजर,डॉ. शिवाजी खिलारे यांच्या नवजिवन हॉस्पिटल मधून साहेसहा हाजार रोकड,रणजित माने या भैरवनाथ कृषी केंद्रातून दोन हाजार,आर टी शिंदे यांच्या नम्रता जनरल स्टोअर्स दुकानातील दहा हाजार,गोंविद मशनरी या दुकान फोडले,चोरट्याचा अन्य काही दुकाने घरे फोडण्याचा प्रयत्न असफल झाल्याचे नागरिकांनी सांगतिले.शुक्रवारी सकाळी मॉर्निग वॉकसाठी चाललेल्या लक्ष्मण बोरडे यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी जत पोलिसात कळविले. दरम्यान जतचे पोलिस निरिक्षक राजू तहसिलदार यांनी भेट दिली. मात्र रक्कमा छोट्या व तपास लागत नाहीत. यामुळे एकानेही पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र भर बाजर पेठेतील चोरीच्या घटनेने नागरिकात भितीचे वातावरण आहे. पोलिसांनी गस्ती पथक नेमावे अशी मागणी होत आहे.





