धनशक्तीवर घेरूनही सुरेश शिंदे गट किंगमेकरचं कोणतीही अनुकूलता नसताना एकट्याच्यां बळांवर सहा नगरसेवकांना निवडून आणले

0

जत,प्रतिनिधी : लोकशक्तीच्या बंळावर जनशक्तीला रोखत कोणतीही आर्थिक ताकत नसताना सामान्य उमेदवारांना उमेदवारी देत सहा नगरसेवक निवडून आणत, राष्ट्रवादीचे नेते, बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांनी आपला शहरातील प्रभाव कायम राखला आहे. सत्तेने त्यांना हुलकावणी दिली असलीतरीही ते त्रिशंकू स्थितीने किंगमेकर ठरले आहेत. पालिकेत सत्ता स्थापन करणे आता त्यांच्या हाती आहे. 

Rate Card

जत शहरातील ताकतवान नेते सुरेश शिंदे यांचा गेल्या तीस वर्षापासून जत शहरातील सत्ता केंद्रात दबदबा कायम आहे. नगरपालिका स्थापनेनंतरच्या पहिल्या निवडणूकीत त्यांच्या विरोधात कॉग्रेस अतर्गंत सांवत गटाने धनशक्तीच्या जोरावर आव्हान दिले होते. ते थोपवत त्यावेळी त्यांनी सर्वाधिक 8 नगरसेवक निवडून आणत आमदार विलासराव जगताप गटाबरोबर युक्ती करत सत्ता मिळविली होती. नंतरच्या काळात पुलाखालून बरेच पाणी गेले. सुरेश शिंदे यांचे राजकीय खच्चीकरण जिल्ह्यातील नेत्यांकडून करण्यात आल्याचे आरोप झाले. वंसतदादा घराण्याशी एकनिष्ठ असल्याने त्यांना एका गटाचा विरोध झाला. त्यातून सावरत नगरपालिकेच्या निवडणूकीत त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश करत सामान्य घरातील आर्थिक पाठबंळ नसलेले जनतेतून आलेले नवे चेहरे घेत पँनेल उभे केले होते. त्यात त्यांनी धनशक्तीच्या विरोधात जोरदार लढत दिली.  सत्ताधारी भाजप, ताकतवान कॉग्रेस समोर मोठे आव्हान उभे केले. टोकांचा प्रचार झाला. शिंदे यांना घेरण्यात आले. त्यांच्या गट सपविण्याचे प्रयोग झाले.विरोधकांच्या धनशक्तीच्या विरोधात एकहाती प्रचार यंत्रणा राबवित शिंदे यांनी झुंज दिली.त्यात त्यांना बहुमत मिळाले नाही. मात्र सहा नगरसेवक निवडून आणत त्यांचा गट मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. कोणतीही ताकत नसताना फक्त जनतेच्या जिवावर त्यांनी सहा नगरसेवक निवडून आणले आहेत. काहींना काटावर पराभूत व्हावे लागले. पंरतू कोणतीही ताकत नसताना त्यांनी मिळविलेले यश त्यांच्या गटाला उभारी देणारे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.