जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या निवडणूकीत शहरातील प्रस्तापित राजकारण्याना धक्का देत शांत,संयमी आ.जगताप यांनी आपला प्रभाव वाढवत पालिकेत भाजपला नंबर 1 बनविले.भाजपचे 7 नगरसेवक निवडून आले आहेत.
जत तालुक्यात गेल्या तिन दशकाहून जास्त काळ आ. विलासराव जगताप राजकारण करतात. तालुकाभर त्यांचा झंझावत असायचा. मात्र; जत शहरात त्यांना सत्ता मिळविता आली नव्हती.ग्रामपंचायतीची नगरपालिका झाल्यावर मात्र आ. जगताप यांनी आपला प्रभाव वाढविण्यास सुरूवात केली होती. गत निवडणूकीत आ. जगताप यांनी आपले पँनेल उभे केले होते.त्यात त्यांना अपेक्षित आले नव्हते. मात्र त्रिशंकू निकालाने तीन नगरसेवक निवडून आल्याने सत्तेत जाता आले. पहिल्या निवडणूकीत कॉग्रेस दोन गट स्वतंत्र लढल्याने कॉग्रेसची ताकत विभागली गेली. त्यात सुरेश शिंदे यांना 8 तर विक्रंम सांवत यांना 7 जागा मिळल्याने बहुमत मिळाले नव्हते. शिंदे व सांवत यांच्या टोकाच्या संघर्ष झाला होता. त्यामुळे प्रांरभी ते दोन गट एकत्र आले नाहीत. आ. जगताप यांनी यांचा फायदा घेत सुरेश शिंदे यांच्याबरोबरचे जुने वैमनस्य विसरून आपल्या गटाकडे उपनगराध्यक्ष मिळविले होते. त्यांनतर झालेल्या निवडणूकीत आ. जगताप आमदार झाले. पुढेही जिल्हा परिषद, पंचायत समितीत सत्ता मिळविली. त्यातही भाजपला जत जत तालुक्यातून चांगली साथ मिळाली. ग्रामपंचायत निवडणूकीतही भाजपने यश मिळविले होते. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणूकीत आ. विलासराव जगताप यांनी शहरात आपले प्रस्त वाढवित सात नगरसेवक निवडून आणत मोठा प्रभाव वाढविला आहे. शिवाय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. रेणुका आरळी यांना पडलेली मते विजयी उमेदवारा पेक्षा 178 मतांनी कमी आहेत. याचांच अर्थ शहरातही आ. जगताप यांचा गट किंबहुना भाजप मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने आ. जगताप आपले जुने मित्र राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते माजी सभापती सुरेश शिंदे यांच्याबरोबर एकत्र येत सत्ता मिळवत उपनगराध्यक्ष भाजपचा बनवतील अशी शक्यता आहे.




