गांजा छापा प्रकरण : एका आरोपीला अटक

0
7

      

उमदी,वार्ताहर :मोरबगी (ता.जत) येथील गांजा शेतीवर उमदी पोलिसांनी छापा टाकून 2,98,000 रु किंमतीचा गांजा जप्त केले होता.छाप्यानंतर संशयित आरोपी फरारी होता. याप्रकरणी मोरबगी (ता.जत )येथील निलाप्पा अर्जुन कारकल (वय 55)  या आरोपीला  मंगळवारी सकाळी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पंधरा डिंसेबर पर्यन्त पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.आरोपी निलाप्पा कारकल यांने त्यांचे घरासमोरील शेतात मक्याच्या पिकात गांजाची लागवड केली असल्याची माहिती उमदी पोलिसांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी नागनाथ वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे,उपनिरीक्षक प्रवीण संपागे यांनी आपल्या फौजफाट्यासह सोमवारी दि 4 रात्री अकराच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला होता. त्यावेळी गांजाची हिरवी व वाळलेली झाडे आढळून आली. पोलीस आल्याची चाहुल लागताच आरोपी त्या दिवशी पसार झाला होता. तेव्हापासून फरार असलेल्या आरोपीला मंगळवारी अटक केली आहे .याप्रकरणी उमदी पोलिसात संशयित आरोपी निलाप्पा कारकल विरुध्द गुन्हा दाखल असून हा आरोपी उत्पादीत केलेला गांजा कोठे विकणार होता? व यामध्ये अजून कितीजण सहभागी आहेत? यासंबधी अधिक तपास सपोनि भगवान शिंदे करीत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here