पालिकेत भाजप-राष्ट्रवादी कॉग्रेस युक्तीचे संकेत ?

0

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या निवडणूकीचा निकालात मतदारांनी दिलेल्या त्रिशंकू कौल यामुुळे कॉग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला असलातरी बहुमत कॉग्रेसला मिळविता आले नाही.कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांनी नगराध्यक्ष निवडून आणत आर्धी लढाई जिंकली आहे. मात्र बहुमताने त्यांना हुलकावणी दिली. त्यामुळे पालिकेतील मोठा पक्ष ठरलेला भाजप व 6 जागा मिळवत किंगमेकर ठरलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस युक्ती होण्याची चर्चा आहे.

जत नगरपालिकेच्या निवडणूकीत आ. विलासराव जगताप, कॉग्रेस नेते विक्रम सांवत,राष्ट्रवादीचे सुरेश शिंदे यांनी प्रतिष्ठेची लढाई लढली त्यात नगराध्यक्ष व कॉग्रेस मित्रपक्ष 7,भाजप 7  व राष्ट्रवादी 6 असे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे बहुमतासाठी कोणत्याही दोन्ही पक्षानी एकत्र गरजेचे आहे. तसा कौल मतदारांनी दिला आहे. त्यामुळे चर्चांना उधान आले आहे. 

Rate Card

राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते माजी सभापती सुरेश शिंदे यांनी पालिका निवडणूकीत प्रथमपासून कॉग्रेसला घेरत त्यांच्या भष्ट्राचारांच्या मुद्यावर आक्रमक प्रचार यंत्रणा राबविली. कॉग्रेसच्या विरोधात शिंदे गट आक्रमक असल्याने कॉग्रेस, राष्ट्रवादी युक्ती होण्याची शक्यता नाही. दुसरीकडे शिंदे यांचे भाजपचे आ. विलासराव जगताप यांच्या सख्यं आहे. अनेक निवडणूका त्यांनी एकत्र येत लढविल्या आहेत. शिवाय प्रथमपासून शिंदे यांचे भाजपचे आ. विलासराव जगताप यांच्या मैत्री आहे. निवडणूकी आधी भाजप राष्ट्रवादी युक्ती होण्याची चर्चा होती, मात्र युक्ती झाली नाही. दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूका लढविल्या. त्यात कॉग्रेसला एकहाती सत्ता मिळविण्यापासून रोखले. आतापर्यतचा राजकीय प्रवास पाहता भाजप-राष्ट्रवादी एकत्र येतिल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे यांनी यापुर्वी पंचायत समितीत भाजपशी युक्ती केली आहे. त्यांच्या गटाचे शिवाजी शिंदे हे उपसभापती आहेत. आ. विलासराव जगताप यांच्या नजिकचा स्पर्धक विक्रम सांवत असल्याने तेही सांवत यांना रोकण्यासाठी राष्ट्रवादीशी युक्ती करतीलं अशा चर्चांना उधान आले आहे.जत शहरासह तालुक्यात विक्रम सांवत यांचा प्रभाव वाढणे दोघांही नेत्यांना अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी पालिकेत बहुमत मिळवून कॉग्रेसला घेऱण्याचा प्रयत्न करतील असेही तर्क लावले जात आहेत.

काहीही समिकरण जुळू शकते

पालिकेत त्रिशंकू अवस्थेमुळे बहुमत मिळविण्याची पार करायची आहे. कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसकडून जिल्ह्यातील जेष्ठ नेते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया आली आहे. सध्यांची परिस्थिती पाहता. कॉग्रेस नेते आ. पंतगराव कदम व राष्ट्रवादी नेते आ. जंयत पाटील यांच्या निर्णयावर सत्ता समिकरण अवलंबून आहे. त्यामुळे जंयत पाटील शिंदे यांना कॉग्रेसशी जुळवून घ्यायचा सल्ला देतात का? निर्णयाचे अधिकार शिंदे यांना देतात यावरही नवे समिकरण अवलंबून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.