जत,प्रतिनिधी :
जत नगरपरिषदेच्या प्रचारासाठी आणखी एक दिवस वाढ केली आहे. त्यामुळे आता 9 डिंसेबर रात्री 10 वाजेपर्यत प्रचार करण्यास मुभा देण्यात आली आहे. मतदान व मतमोजणी नियोजित वेळी होईल.
श्री यल्लमादेवीच्या यात्रेमुळे मतदान कार्यक्रम दोन दिवस आधी घेतला होता.
जाहीर प्रचार कधी संपणार याबाबत नेमकी माहिती दिली नव्हती. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम,1965 च्या कलम 23 मधील तरतुदीनुसार निवडणूकीच्या दिवशी जाहीर सभा घेण्यास मनाई आहे. शिवाय बैठक व ध्वनिवर्धकांच्या प्रचारास बंदी आहे. त्यामुळे मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे ता.9डिसेंबरला रात्री 10 वाजेपर्यत जाहीर प्रचार करता येणार आहे. तशा आदेशाचे पत्र निवडणूक आयोगाचे उपसचिव ध.मा. कानेड यांनी काढले आहे.





