नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी सर्वाचे प्रयत्न चार रणरागिणीतून होणार पहिल्या महिला नगराध्यक्षाची निवड
जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदेत निवडणूकीत पहिल्या महिला नगराध्यक्ष पदासाठी कडक प्रचार झाला आहे. थेट नगराध्यक्षांना मोठे अधिकार असल्याने नगरसेवकां पेक्षा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी सर्व पक्षीनी जादा ताकत लावल्याचे चित्र आहे. गत पाच वर्षापुर्वी ग्रामपंचायतीची नगरपरिषद झाली.

राष्ट्रवादी व भाजपची सत्ता आली.नगरसेवकातून नगराध्यक्ष निवड करण्यात आली.त्यात पहिल्या नगराध्यक्ष पदासाठी पहिले अडीच वर्षासाठी अनुसुचित जाती पुरूष आरक्षण पडल्याने पहिले नगराध्यक्ष म्हणून रविंद्र साळे यांना पहिली संधी मिळाली.पुढचे अडीच वर्षे ओबीसी पुरूष आरक्षणामुळे नगराध्यक्ष म्हणून इकबाल गंवडी झाले, ते अखेर पर्यत राहिले. यंदा थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. त्यात ओबीसी महिला आरक्षण पडले आहे. त्यात यंदा चार ओबीसी महिला नशिब आजमावत आहेत. भाजपकडून डॉ. रेणुका आरळी, कॉग्रेसचे शुंभागी बन्नेनावर, राष्ट्रवादीच्या शबाना इनामदार व शिवसेने कडून शांता राठोड निवडणूक लढवित आहेत. नगराध्यक्षपदाचा उमेदवारांचीच जास्त चर्चा झाली आहे.
