जत,प्रतिनिधी : जत शहरात पुन्हा डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्याने तिंघाना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन झाले आहे. त्यांच्याच घरातील अन्य दोघांना डेंग्यूचा डंक झाल्याचा संशय आहे.शहरातील ब्राम्हणपुरी परिसरात महिन्याभरात तीन रुग्ण व दोन संशयित आढळून आले आहेत.शिवाय शहरभर डांसाचा कहर झाला आहे. दिवसरात्र डांसानी नागरिकांना हैराण केले आहे. तरीही नगरपालिकेच्या यंत्रणा निद्रिस्त आहे.डेंग्यूचा विळाखा वाढत असताना उपाययोजना शुन्य असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील ब्राम्हणपुरीत राहणारे मुद्रांक विक्रेते गणपती शंकर वायफळकर,त्याच्या पत्नी व मुलगा राहूल यांना डेंग्यूची लागण झाल्याचे तपासणीत निष्पन झाले आहे. प्रांरभी थंडी,तापाची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांनी जतमधील खाजगी रुग्णालयात उपचार घेतले.त्यांनतर तिघांना सांगली येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. गेले अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
यापुर्वीच देशपांडे वाडा परिसरात दोन बालकांना डेंग्यूची लागण झाली होती. वायफळकर कुटूंबियही या परिसरात रहतात.याबाबतची माहिती मिळताच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.जी.पवार यांनी वंळसग आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व्हेक्षण व पाहणीच्या सुचना दिल्या आहेत. नगरपालिका स्थापन होऊन पाच वर्षे संपली. तरीही सत्ताधारी किंवा प्रशासनाला आरोग्य विभाग करता आला नाही. पालिकेकडे आरोग्य यंत्रणाच नाही.डांसाचा उद्रेक झाला असताना बंदोबस्तासाठी यंत्रणा नाही.कर्मचारी नाहीत.सांडपाणी,गटारी,वेळत प्रवाहित होत नसल्याच्या तक्रारी आहेत.ग्रामीण रुग्णालयात शहरासाठी कर्मचारी नियुक्ती नाही.त्यामुळे सर्व्हेक्षण,धुराची फवारणी,डबके मुजविणे,सांडपाण्याचा निचरा करणे,गटारीचे प्रवाह प्रवाहित करणे,अशी कामे अनेक दिवस होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. यापुर्वी डेंग्यूने दोन रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्यात. आताही शहरातील भयानक स्थिती आहे. डांसाच्या तुफान उत्पत्तीने शहरभर उद्रेक केला आहे. शहरातील डांस नाहीत असा एकही भाग नाही. कुठेही उभारला तरी डांस फोडून काढत आहेत.गत दोन महिन्यात डांसाची संख्या वाढली आहे. परिणामी डेंग्यू,चिकनगुणीयाचे रुग्ण आढळत आहेत. वेळीत उपाययोजना कराव्यात अन्यथा नाहक जिव गमविण्याची वेळ नागरिकावर येऊ शकते.