जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी उमेदवार घोषित झालेले व निवडणूक लढवयाची म्हणून रिंगणात असलेल्या उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे.पक्षाच्या व काही अपक्ष
उमेदवारांच्या प्रचाराचे नारळ फुटले आहेत.
जत नगरपालिकेच्या निवडणूकीचे धुमशान चालू झाले आहे. अर्ज माघार मंगळवारी होणार आहे. त्याअगोदर कॉग्रेस, भाजप, राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार घोषित झाल्याने त्यांनी घरोघरी भेट घेत प्रचार यंत्रणा सुरू केली आहे. तिन्ही पक्षाचा प्रचार शुभारंभ झाला आहे. त्यामुळे बैठका,जेवणावळी, व थेट संपर्क सुरू केला आहे. थेट नगराध्यक्ष पदासाठी पुर्ण शहराचे मतदान असल्याने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दररोज दहा ते बारा ठिकाणी बैठका,सध्यांकाळी जेवणावळी, व रात्री उशिरापर्यत व्यक्तिगत भेटीवर जोर दिला आहे. नगरसेवक पदासाठीही मोठी चुरस असल्याने सर्वच प्रभागातील उमेदवार सक्रीय झाले आहेत. पक्षाने उमेदवारी न दिलेले अनेक जण अपक्ष म्हणून मैदानात उतरणार आहेत. त्यांच्याकडून प्रचार सुरू झाला आहे. पक्षाच्या उमेदवारीना दगाफटका होण्याच्या शक्यतेनी अनेक आश्वासनाचे आमिष दाखून बंड केलेल्या उमेदवारांनी माघारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. नगराध्यक्ष पदासाठी 5 व नगरसेवक पदासाठी 129 अर्ज छानणीनंतर शिल्लक राहिले आहेत. पक्षाची पँनेल तयार झाली आहेत. त्याचे पक्ष कार्यालये सुरू झाली आहेत. एंकदरीत सर्वच पातळीवर यंतणा गतिमान झाल्या आहेत. शहरातही निवडणूकीचा ज्वर वाढल्याने विकासाचे मुद्दे बाजूला पडल्याचे चित्र आहे. आरोप करणारे अनेक जण सर्वकाही विसरून गेल्याचे चित्र आहे.





