लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण

0
9

जत,प्रतिनिधी:जत शहरातून एका शाळकरी अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी जत पोलिसात दाखल केले आहे. त्याप्रकरणी एक पुरूष व दोन महिला विरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. घटना सोमवारी सकाळी सात ते बाराच्या सुमारास घडली.

शहरातील एक अल्पवयीन मुलगी सोमवारी सकाळी शाळेत गेली होती. संशयित अभिजित अशोक शिंदे, व त्यांची आई अलका अशोक शिंदे (रा.जत), सावित्री भिमराव चौगुले (रा.कवटेमहांकाळ) यांनी संगनमताने लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेले आहे.असे  मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जत पोलिस अधिक तपास करत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here