जतला भष्ट्र करण्याचे पाप करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल आ. विलासराव जगताप ; भाजपचे उमेदवार घोषित : यंदा नगराध्यक्षासह पालिकेत भाजपचीच सत्ता

0


जत,प्रतिनिधी : जत नगरपालिका निवडणूकीसाठी भाजपने नगराध्यक्ष सह मित्रपक्षाच्या जागा वगळता सर्व उमेदवार घोषित केले.भाजप व रासप,रिपाइं असे मित्रपक्षाचे पँनेलने लावण्यात आले आहे. त्यात

रासप 2,रिपाइंला 1 जागा देण्यात आली आहे.  आमदार विलासराव जगताप यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जत नगरपालिकेतील भ्रष्ट कामाचा पंचनामा करताना आमदार जगताप म्हणाले सत्ताधाऱ्यांने शहराला भकास केले आहे. आम्ही सर्व चेहरे स्वच्छ प्रतिमेचे दिले आहेत. चांगले लोकमत असणाऱ्या उमेदवारी देण्यात आली आहे. शहरातील भ्रष्ट कारभारांने शहराची वाट अनेक वर्ष सत्ता असणाऱ्यांनी लावली आहे. आता पर्यत झालेली विकास कामे जिल्हा नियोजन मधून झाली आहेत. नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी विकास कामापेक्षा भष्ट्राचार केला आहे. विकासाच्या नावावर पाप करणाऱ्या बाजूला ठेवले आहे.गेले अनेक वर्षे सत्ता असणाऱ्यांनाही आम्ही बाजूला ठेवले असून यावेळी नगरपालिकेत भाजपचा नगराध्यक्ष सह बहुमताने सत्ता मिळवू असे आ. जगताप यांनी शेवटी सांगतिले.नगरपालिका निवडणूकीत स्टार नेत्यांच्या सभा होणार आहेत. त्यात मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस,सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख,ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंधारण मंत्री राम शिंदे,यांच्या सभेचे नियोजन असल्याचे आ.जगताप यांनी सांगितले.यावेळी भाजप नेते डॉ.रविंद्र आरळी,अॅड. श्रीपाद अष्टेकर,शिवाजीराव ताड उपस्थित होते.

उमेदवार : 

थेट नगराध्यक्ष :डॉ. रेणुका रविंद्र आरळी

प्रभाग 1.जिजाबाई मारूती संकपाळ, (दुसरी जागा रासपला सोडली आहे,उमेदवार घोषित नाही.)

प्रभाग 2.कल्लाप्पा हणमंत पाथरूट

विजयालक्ष्मी चंद्रकांत गुड्डोडगी

प्रभाग 3.प्रमोद सदाशिव हिवरे

दिप्ती उमेश सांवत 

प्रभाग 4. (आरपीआयला जागा सोडली,उमेदवार घोषित),श्रीदेवी मल्लिकार्जून सगरे

प्रभाग 5. शाहीन सलिम गंवडी

Rate Card

गजानन बाळासाहेब यादव

प्रभाग 6.जयश्री दिपक शिंदे

विजय शिवाजी ताड

प्रभाग 7.फुलाबाई बाळासो बंडगर

प्रविण रंगराव वाघमोडे

प्रभाग 8.(ही जागा रासपला सोडली आहे, उमेदवार घोषित नाही)

दुसरा उमेदवार घोषित नाही


प्रभाग 9.जयश्री तुकाराम मोटे

आजिंक्य बाबासाहेब सांवत


प्रभाग 10.(उमेदवार घोषित नाही)

विमल भिमराव वास्टर 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.