यशाचा मूलमंत्र

0

यशस्वी होण्यासाठी मेहनत,जिद्द,चिकाटी महत्त्वाची आहेशाळेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचे असेलभरपूर अभ्यास कराअसे सांगितले जाते.भरपूर यात आळस न करता मेहनत घेणे अभिप्रेत आहेअभ्यासात कंटाळा करून चालत नाही.थांबून चालत नाहीकारण थांबला तो संपलाहे कोणी तरी सांगून ठेवले आहेपण हीच जिद्द,मेहनत आणि चिकाटी कायम राहायची असेल तर आपल्याला ऊर्जा देणार्या यशस्वी लोकांच्या कथा वाचायलाऐकायला हव्यात.त्यांच्या यशवीतेसाठी आलेल्या टीप्स पाहायला हव्यात.त्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळून जातेआणि आपल्यातला कंटाळाआळस कुठल्या कुठे पळून जातोजे विद्यार्थी आहेत,त्यांनी अशा कहाण्या जरूर वाचायला हव्यात.गुगलचा संस्थापक लॅरी पेजपासून विकिपिडियाचे संस्थापक जिमी वेल्स यांनीही आपल्या यशाचे गमक शेअर केले आहे.आजच्या काळात माहिती हीच मोठी ताकद आहेअसे मानणार्या या दोघांच्या यशाचा मूलमंत्र आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे.

गुगल आणि विकिपिडियापर्यंत प्रत्येकाला सहज पोहचता येतं.यावर कुठल्याही प्रकारचे,कुणालाही निर्बंध नाहीततुम्हालाही जीवनात काहीही न लपवता पारदर्शकतेला महत्त्व देण्याची गरज आहे.लॅरी पेज आणि जिमी वेल्स दोघेही चॅरिटी आणि शिक्षणासाठी खूप काम करतातजर तुम्ही चांगले काम करत असाल तर खूप खूप छान वाटतंजीवनात बदल जाणवतो.

छंदाला काम बनवा

तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा तुम्हाला असे काम शोधायला हवेजे तुम्हाला आवडते.यानंतर पूर्ण आयुष्य काम करण्याची आवश्यकता नाहीयाचा अर्थ असा की,तुम्हाला आवडीचे काम करताना ते काम आहेहेच वाटणार नाही.लॅरी पेज आणि जिमी वेल्स यांच्या म्हणण्यानुसार त्यांना दोघांना लहानपणापासून माहिती मिळण्याची आवड होती.आपणही यावर अधिक भर द्यायला हवा.

थिंक ग्लोबल

विकिपिडिया आणि गुगलचा पसारा संपूर्ण जगभर पसरला आहे.त्यांनी टेक स्टार्टअपच्या रुपात सुरुवात केली होती.त्यांनी प्रोजेक्ट डवलपमेंट आणि खात्रीशीर ग्राहक मिळवण्यावर विश्वास ठेवला.लोकांच्या गरजेनुसार सर्व्हिसेजमध्ये बदल करताना लॅरी पेज आणि जिमी वेल्स यांना यश मिळत गेले.तुम्हीही असेच हळूहळू पुढे पुढे सरकायला हवे.

योग्य लोकांची मदत

Rate Card

इॅरी पेज आणि जिमी वेल्स यांनी समजूतदार लोकांशी मिळून आपले काम पुढे नेण्याला प्रोत्साहन दिले.जर त्यांच्याजवळ योग्य माणसे नसती तर त्यांना प्रगती करताना अडचणी आल्या असत्यारोज विकिपिडियामध्ये शेकडो अपडेटस होत असताततर गुगलमध्ये नवीन वेब पेजेज इंडेक्समध्ये जोडले जातात.यासाठी सातत्याने कठोर मेहनत महत्त्वाची आहे.तुम्हाला आपल्या भवितव्याचा विचार करून योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

अपयशात यश

इॅरीने सर्च एल्गोरिदमचा अविष्कार केलाते त्याने याहूला विकण्याचा प्रयत्न केला.पण योग्य असा सौदा झाला नाहीबोलणी फिस्कटली.जिमीचा सायंटिफिक ऑनलाईन इनसायक्लोपिडिया नापास झालाअपयशातून ते शिकले आणि दोघांनीही आपल्यात सुधारणा केल्याआणखी एक महत्त्वाचे म्हणजे दुसर्याचे पाहून आपल्यात बदल करायचा नाही.दोघांचेही म्हणणे आहे कीतुम्ही जसे आहाततसे राहागुगल आणि विकिपिडियामध्ये काही दोष असतील आणि ते कुणी सांगितले तर ते लगेच त्यात सुधारणा करतात.इंटरनेट सेन्सॉरशीपबाबत या दोघांनीही विरोध दर्शविला आहेतुमच्यामध्येदेखील अशा प्रकारचे धाडस असायला हवे.-

मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.