भिवर्गीत झोपड्यांना आग लागून पावनेतीस लाखाचे नुकसान

0

दरिबडची, वार्ताहर: भिवर्गी  (ता.जत ) येथील शेतमजुरांच्या पत्राशेड झोपड्यांना अचानक आग लागून 2 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले.रोख रक्कम संसारउपयोगी साहित्य,धान्ये जळून खाक झालीत.सोमवारी घटना दुपारी 2 वाजता घडली.कोणतीही जिवीत हानी झाली नाही.  घटनेचा पंचनामा मंडल अधिकारी रोहित पाटील यांनी केला.आगीचे नेमके कारण समजले नाही.                पूर्व भागातील भिवर्गी येथील अंकलगी रोडवरील हनुमान मंदिराजवळ शेतमजूरांच्या पत्रावजा झोपड्या आहेत.या ठिकाणी 20 मजुर राहतात.सर्व मजुर शेतीकामासाठी गेलेले होते.अचानक रवि भिमा खोत यांच्या झोपडीला आग लागली. त्या वस्तीवर संगीता रानगट्टे ही एकटीच होती.तिने आरडाओरड करुन लोकांनी मदतीला बोलावले.पण झोपडी समोर लाकडी छप्पर असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते.त्यामुळे आग लवकर आटोक्यात आली नाही. मात्र ग्रामस्थांनी पाणी मारून प्रयत्न केल्यांनी पूढील झोपड्याना आग लागली नाही.त्यामुळे  पुढील मोठा अर्नथ टळला.                                 

आगीमध्ये रवि भिमा खोत यांचे 90 हजाराचे साहित्य व 2500 रोख रक्कम शिवबाई कल्लाप्पा बजंत्री यांचे 60 हजारांचे साहित्य,कमल चिदानंद रानगट्टे यांचे 70 हजारांचे साहित्य व कानातील सोन्याची रिंग, जयश्री सिद्रम नरळे यांचे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.यामध्ये धान्ये, कपडे, भांडी, रोख रक्कम जळून खाक झाले आहे.सर्व शेतमजूर आहेत.त्यांचे संसार  उघड्यावर पडले आहे.


Rate Card

आगीत भस्मसात झालेले झोपडीतील संसारउपयोगी साहित्य

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.