भाजपच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या डॉ.रेणुका आरळी उमेदवार

0
5

 

जत,प्रतिनिधी : भाजपकडून जत नगरपालिकाच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे जेष्ठ नेते डॉ. रविंद्र आरळी यांच्यावर विश्वास टाकत त्यांच्या पत्नी डॉ. सौ. रेणुका आरळी यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

जत शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील बडे प्रस्त भाजपचे विश्वासू नेते म्हणून डॉ.आरळी शहरात प्रसिध्द आहेत. अनेक सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या डॉ.आरळी यांना माननारा मोठा गट शहरात आहे. त्या धर्तीवर त्यांच्या पत्नीला उमेदवारी देत आ. विलासराव जगताप यांनी ठेवणीतील अस्ञ मैदानात उतरविले आहे. उच्च शिक्षित,मनमिळावू व्यक्तिमहत्व असलेल्या डॉ. रेणुका आरळी ह्या शहरात परिचित आहेत. त्याशिवाय सोलापुरातील बडे प्रस्त माजी आमदार स्वर्गीय बाबासाहेब तानवडे यांच्या कन्या व डॉ. आऱळी यांच्या पत्नी यामुळे डॉ. रेणुका आरळी यांनी राजकारण जवळून अनभुवले आहे. त्यामुळे राजकीय सारीपाटावर डॉ. रेणुका आरळी मजबूत उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. देश,राज्य,जिल्हा, तालुका ते नगरपालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी भाजपकडून मोठे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचाच भाग म्हणून डॉ. रेणुका आरळी यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्याशिवाय नगरसेवक पदाचेही उमेदवार लवकरच घोषित करण्यात येणार आहेत. मात्र त्याअगोदर भाजपकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित केल्याने विरोधी गटाला विचार करायला लागला आहे. एंकदरीत जत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी डॉ. रेणुका आरळी लोकाश्रय मिळविणाऱ्या उमेदवार ठरल्यास वावगे वाटू नये.

डॉ. रविंद्र आरळी यांनी गत दोन तपाहून जास्त काळ भाजप मधून तालुक्यात राजकारण केले आहे. आतापर्यत ते थेट राजकीय आखाड्यात कधी उतरले नव्हते.मात्र यावेळी परिस्थिती बघून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी त्यांच्या पत्नीला देऊन पक्षाने मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे. यामुळे ते सक्रीय राजकारणात आले आहेत. शहरात एक वेगळं वलयाकिंत चेहरा म्हणून डॉ. रविंद्र आरळीचा बोलबाला आहे. त्यामुळे ते राजकारण्यातील ठेवणीतील मजबूत अस्ञ ठरले आहेत.त्यांच्या पत्नीच्या उमेदवारीने जत शहरात भाजपला मोठी ताकत मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षात भाजपला किंबहुना आ.जगताप यांना नगरपालिकेत जे जमले नाही ते यावेळी होण्याची शक्यता आहे. जत पालिकेवर भाजपचा पहिल्या नगराध्यक्ष पदासाठी डॉ.रेणुका आरळी प्रमुख दावेदार ठरत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here