बेंळूखी ग्रामपंचायतीच्या उपसंरपच पदी कल्पना चव्हाण

0
9

जत,प्रतिनिधी : बेंळूखी ता.जत येथील ग्रामपंचायतीच्या उपसंरपच पदी भाजप प्रणित सिध्दनाथ व संदानंद ग्रामविकास पँनेलच्या कल्पना रमेश चव्हाण यांची निवड झाली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीत निवडणूकीत भाजपचे पाच सदस्य निवडून आले आहेत. गुरूवारी उपसंरपच पदासाठी निवड झाली त्यात कल्पना चव्हाण यांना 5 मते पडली तर विरोधी उमेदवारांना 4 मते पडली.निवडी नंतर फटाक्याच्या आतषबाजीत गुलालाची उधळन करत जल्लोष करण्यात आला.

बेंळूखीतील टोकाच्या दुरंगी लढतीत भाजपचे शंशिकात जाधव,सुधाकर माळी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली. अटीतटीच्या लढतीत शंशिकात जाधव यांचे वडील थेट संरपच पदाचे उमेदवार धोंडिराम जाधव यांना थोड्या मताने पराभव पत्करावा लागला. मात्र पाच सदस्य निवडून आल्याने बहुमत मिळाले होते.त्यामुळे उपसंरपच त्याच्यांच गटाचा झाला.कमल संभाजी चव्हाण, मायाक्का सुरेश अनुशे, भारती सदाशिव अथणी,सदाशिव उत्तम चंदनशिवे हे सदस्य उपस्थित होते.

यावेळीसोसायटीचे चेअरमन महादेव माळी, लक्ष्मण माळी,माजी उपसंरपच सिंगू अनुशे, संभाजी चव्हाण,विजय चव्हाण, तानाजी चव्हाण, परसू चव्हाण,भिमा माळी, रेवाप्पा माळी,आण्णाप्पा अथणी, अशोक माळी,नानासो चव्हाण, महादेव माळी,शंहाजी शिंगाडे,नरिसिंग चंदनशिवे,आबा चंदनशिवे,गौतम चंदनशिवे, अतुल चंदनशिवे, संदिप चव्हाण, सदाशिव भेरडे,विलास बाबर,अंकुश चव्हाण, सुभाष सुतार,जगन माळी,नरसिंग माळी,नामदेव चंदनशिवे, विठ्ठल माळी,दामाजी माळी,मोहन माळी,शामराव चव्हाण, राजू चव्हाण, शंकर माळी,केदारी चौगुले, तानाजी माळी,विलास माळी,रवि चव्हाण, माणिक चव्हाण, निवास चंदनशिवे, अमित लांडगे आदि मान्यवर उपस्थित होते.

चौकट :

बेंळूखी ग्रामपंचायतीच्या विकास कामासाठी आमचे कायम सहकार्य राहिल. मात्र सत्तेआडून काही चुकीचे होत असल्यास आमचा विरोध असेल. मतदारांनी आमच्या उमेदवार व नेतृत्वावर दाखविलेल्या विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आमचे पाच शिलेदार सतर्क राहतील. लोकहिताच्या कामासाठी आमचा कायम प्रयत्न राहिल.

शंशिकात जाधव, सुधाकर माळी 

फोटो 

बेंळूखी ग्रामपंचायतीच्या उपसंरपच पदी कल्पना चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल जल्लोष करण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here