शासकीय कर्मचाऱ्यांना कोंडल्या प्रकरणी माजी पंचायत समिती सदस्यावर गुन्हा दाखल वळसंग मधील घटना : पोलिस बंदोबस्तात संरपच निवड

0
4

जत,प्रतिनिधी : वळसंग ता.जत येथील संरपच निवड प्रक्रियेत अडथळा आणून अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोंडल्या प्रकरणी माजी पंचायत समिती 

सदस्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. ग्रामसेविका स्वाती मस्के यांनी याप्रकरणी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.

मंगळवारी वळसंग ग्रामपंचायत कार्यालयात संरपच निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.त्याचे कामकाज सुरू असताना काही अपात्र  सदस्यांनी अपात्रतेला स्थगिती आणल्याचे पत्र सादर केल्याने व कोहरम पुर्ण होत नसल्याने सभा दुसऱ्या दिवशी घेण्यात येईल असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितल्याने संतप्त झालेले एका पक्षाचे प्रमुख असलेले माजी पंचायत समिती सदस्य म्हाळाप्पा केंच्चाप्पा पुजारी यांनी उपस्थित मंडल अधिकारी बुकटे, ग्रामसेविका व कर्मचाऱ्यांना शिवागाळ करत आजच संरपच निवड घ्या म्हणत शासकीय कामात अडथळा आणला.कार्यालयास बाहेरून कुलूप लावून अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोंडून घातले होते. यांची कल्पना मिळताच तहसिलदार अभिजित पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुटका केली होती.  सदस्य नसताना म्हळाप्पा पुजारी यांनी निवडणूक कामात अडथळा आणला,अर्वाच्च शिवागाळ केली. फिर्यादी ग्रामसेविका मस्के यांना हातवारे करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.तसेच मंडल अधिकारी बुकटे यांनाही शिवागाळ केली. असा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे. आरोपीस अद्याप अटक नाही. अधिक तपास सा. पोलिस निरिक्षक गजानन कांबळे करत आहेत. दरम्यान बुधवारी पोलिस बंदोबस्तात संरपच निवड झाली. मंगळवारच्या वादामुळे गावात तणाव आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here