संरपच निवड वेळेत न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी व कर्मचाऱ्यांना चार तास कोंडले वळसंग मधील प्रकार
जत,प्रतिनिधी: वळसंग ग्रामपंचायत संरपच निवडीवेळी झालेल्या दोन प्रमुख गटाच्या वादातून निवडूक निर्णय अधिकारी,ग्रामसेविका,कर्मचारी यांना चार तास कोंडून ठेवल्याचा प्रकार घडला आहे.ग्रामपंचायतीचे सदस्य रद्द,संरपच अविश्वास ठराव यामुळे वळसंग ग्रामपंचायत वादग्रस्त ठरली आहे. मंगळवारी नव्या संरपच निवडीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र सदस्यांनी गोंधळ घातल्याने संरपच निवड करता आली नाही.काही सदस्य व नेत्यांनी हे कृत्य केले. त्यांच्या विरोधात जत पोलिसात रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
वळसंग संरपचावर अविश्वास ठराव आणल्याने संरपच पदाच्या रिक्त जागेवर नुतन निवडीसाठी सभेचे आयोजन केले होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माडग्याळचे मंडल अधिकारी नंदकुमार भुकटे प्रक्रिया पुर्ण करत होते.त्यावेळी ग्रामसेविका स्वाती मस्के व कर्मचारी उपस्थित होते.सदस्य अपात्रतेच्या वादग्रस्त मुद्यावर निवडणूक निर्णय अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. त्यामुळे संरपच निवडीला विलंब झाला. त्यावेळी दोन सदस्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व ग्रामसेविकेशी वाद घातला. शाब्दीक वादावादीने संतप्त झालेल्या भाजपच्या सदस्यांनी आक्रमक होत ग्रामपंचायत कार्यालयास बाहेरून कुलूप लावले.त्यामुळे मंडल अधिकारी बुकटे,ग्रामसेविका मस्के, तलाठी वंदना मजगे,कोतवाल महेश कांबळे व लिपिक सुभाष कांबळे यांना कोंडून ठेवण्यात आले.अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदस्य कुलूप काढत नसल्याने थेट तहसिलदार अभिजित पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना बरोबर घेत वळसंग आले. पोलिसांनी कार्यालयाचे कुलूप तोडून अधिकारी व कर्मचारी यांची सुटका केली.वळसंग ग्रामपंचायतीत कॉग्रेसचे पाच व भाजपचे तीन असे बलाबल आहे. सत्ताधारी कॉग्रेसच्या तिन्ह सदस्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेतला म्हणून त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते.त्यामुळे त्यांना सभेची नोटिस दिली नव्हती.मात्र या तिन्ही सदस्यांनी पुणे आयुक्ताकडे दाद मागितली होती.त्यात त्यांना आयुक्ताने पात्र ठरविले होते.संरपच निवडीवेळी न्यायालयाच्या आदेशाची प्रत सादर करत त्यांनी संरपच निवडीची फेरसभा घेण्याची मागणी केली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तहसिलदार यांच्याशी संपर्क साधून मार्गदर्शन मागविले.तहसिलदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. यामुळे कार्यक्रमास विलंब झाला. त्यामुळे भाजप कार्यक्रर्ते संतप्त झाले.त्यांनी गोंधळ घातला.ठरलेल्या वेळेत सभा घेण्याची मागणी लावून धरली.त्यामुळे प्रकरण वादग्रस्त झाले.वादावादीने भाजप सदस्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी,कर्मचारी यांनी कोंडून ठेवले.याबाबतची फिर्याद दाखल करण्यासाठी मंडल अधिकारी बुकटे पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. पोलिसात रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

