भगवान शिंदे उमदीचे नवे ठाणेदार गुन्हे व अवैध धंदे रोखण्याचे मोठे आव्हान

0

उमदी,वार्ताहर:उमदी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे यांची उचलबांगडी झाल्याने  त्या रिक्त जागी कोकरुड पोलीस ठाण्याचे सपोनि भगवान शिंदे यांची नियुक्ति केली असून त्यानी उमदी पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारला आहे .उमदी पोलीस ठाणे म्हणजे अवैध व्यवसायाचे आर्थिक केंद्र बनल्याने अकार्येक्षम अधिकारी उमाकांत शिंदे यांची उचलबांगडी करण्याची मागणी उमदीकरांनी केली होती.एकेकाळी उमदी पोलीस ठाणेची वाहवा अख्या राज्यात पसरली होती  प्रभारी पोलीस अधिक्षक म्हणून डॉ. रवींद्र शिसवे यांनी अवैध व्यवसायाची मुसक्या आवळले होते, गांजाचा तर सुपडासाप केले होते.त्यावेळी पोलीस म्हटले की ,अवैध व्यवसायिक कापत होते.मात्र अलीकडे या पोलीस ठाण्याचे अवस्था इतकी बिकट झाली आहे की अवैध व्यवसायिकांवर पोलिसांचा वचकच राहिला नसून त्यामुळे जुगार, मटका,हातभट्टी आदी व्यवसायिकांचा दरारा वाढला आहे. त्यामुळे अकार्यक्षम अधिकारी उमाकांत शिंदे यांची उचलबांगडी करावी अशी मागणी वारंवार होत होती .उशिरा का होईना शिंदे यांची उचलबांगडी करण्यात आली.

Rate Card

 मात्र सदरील रिक्त जागी कार्यक्षम अधिकारी हजर होणार की जुन्या अधिकाऱ्याच्या हातावर हात मारणारा अधिकारी हजर होणार अशी चर्चा होत,असताना कोकरुड पोलीस ठाण्याचे भगवान शिंदे यांची नियुक्ति करण्यात आली आहे. भगवान शिंदे हे कोकरुड पोलीस ठाण्यात कार्यरत असताना एका शेतकऱ्याला मारहाण प्रकरणी वादग्रस्त बनले होते. तेव्हा पासूनच त्यांच्या बदली साठी कोकरुड येथील नागरिक व सामाजिक संघटनांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढुन आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यातुनच त्याची बदली झाली असल्याचे बोलले जाते. मात्र उमदी उमदी पोलिस ठाणे हददीतील अवैधं धंदे रोखण्याचे मोठे आव्हान त्याच्या संमोर आहे. नुतन सहायक पोलिस निरिक्षक भगवान शिंदे हे अवैध धंद्याना आळा घालणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.