विकास करण्याच्या नावावर पांढऱ्या पोशाखात मिरवणारे पुढारी हा विकास करु, जनतेचे प्रशन सोडवू, अन्यायला वाचा फ ोडू इ. या प्रश्नांना घेवून सत्तेवर येतो खरा, पण या प्रश्नांचे निराकरण करायचे सोडून भलतेच काहीतरी होतांना दिसत आहे. पुढाऱ्याच्या पुढारपणाचे दुकान जर तेजीत चालयचे असेल तर त्याला विकास करुन भागेल कसे ? जनेचे प्रश्न सर्व संपले तर त्या पांढऱ्या कपडयांना भाव येणार कुठून, हौसे नौसे त्यांच्या मागे पुढे फि रणे बंद होईल. त्यामुळेच कोणताच पुढारी राज्याचा व देशाचा विकास, जनतेचे प्रश्न यावर राजकारण करत आहे. राजकारणाची व्याख्या एका बंद खोलीत दबून राहिल्याने सर्वसामान्यांचे व देशाचे किती नुकसान होत आहे याचे देणे घेणे कोणालाच नाही. त्यामुळे देश अधोगतीकडे जात आहे. देशात जाती पातीचे राजकारण करुन गल्लीपासून दिल्लीपर्यंत हीच एक साखळी तयार झाली आहे. प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाण नसल्यामुळे कुठेतरी देश हरवल्या हरवल्यासारखा वाटत आहे. एखादा इतरांपेक्षा चांगले काम करु पहात असेल तर त्याचे वेळीच तोंड दाबण्याचा व त्याच्या विचारांना, कार्याला हानून पाडण्याचा प्रयत्न पांढऱ्या पोषाखातील काळे नेते करतांना कित्येकता पाहिलेत पण, हे थांबणार कधी ? याचा विसर सर्वांनाच पडला असल्यामुळे देशातील तमाम सर्वमसामान्य वंचीतांचा घात होत आहे. इतर देशांचा विचार केल्यास तिथल्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत देश किती तरी पटीने मागे आहे. त्यातच देशातील जनता महासत्ता बनन्याचे स्वप्नं पहात आहे. हे असंच चालू राहिलं तर महासत्ता होण्याचं स्वप्नं पूर्ण होईल का ? अस प्रश्न प्रत्येकाला पडयला हवा. एखादा पुढारी प्रत्येक वेळी तीच चुक करत असेल व विकासाच्या नावाखाली तेढ निर्माण करत असेल, तर सर्वसामान्य जनतेच्या असामान्य ताकदीचा उपयोग करुन त्या विचारांना, कृत्याला वेळीच आवर घातला पाहिजे. आणी तेही प्रत्यक्षात ! हल्लीच्या राजकारणात भडक भाषण करणे व लोकांची दिशाभूल करणे यातच पुढाऱ्यांचे सौख्य सामावलेलं असतं. जाती जातीत भांडणे लावणे, एखादी घटना घडली तर लोकांचा गोंधळ उडवून त्यांची दिशाभुल करणं हा पांढरपेशींचा पिंडच असतो. मात्र तरीही सर्वसामान्य जनता मुग गिळून गप्प राहिल्यासारखी पुन्हा नव्याने राजकारण्यांच्या नावाने खडे फ ोडायला सुरूवात करते. अरेरे हे म्हणजे असं झालं ङ्कआपलेच दात अन आपलेच ओठङ्ख. हे कुठं तरी थांबलं पाहिजे, जाब विचारला पाहिजे, नाही तर पांढऱ्या पोषाखातील गुंड देश विकून खातील. बंद करा पुढाऱ्यांची लाळ पुसणे, बंद करा पुढाऱ्यांच्या मागे पुढे गोंडा घोळणे, जोपर्यंत आपण याला आवर घालणार नाही तोपर्यंत पुढारी विकासाच्या नावाखाली भावनीक राजकारण करणारच. जनता करु देते म्हणू हे करतात. याला वेळीच आवर घातला पाहिजे. हे असे घडले नाही तर पुढाऱ्यांना विचारणार कोण ? असा प्रश्न आपल्याला आपल्या आयुष्यात आयुष्यभर सतावत राहणार हे नक्की !
– शंकर चव्हाण , अंबाजोगाई – ७५८८१७९७८८ hr.shankarchavan@gmail.com