कुडलसंगम येथील गोंधळी समाजाच्या मेळाव्यास लाखो समाजबांधव जाणार

0

जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र व कर्नाटकातील अखिल कर्नाटक  गोंधळी समाज संघाच्या वतीने आज कर्नाटकातील  कुडलसंगम येथे भव्य गोंधळी समाजाचा मेळावा आज संपन्न होत आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील एक लाख समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र गोंधळी समाजाचे मार्गदर्शक  ह.भ.प. तुकारामबाबा महाराज यांनी दिली.

मेळाव्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामया व महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दोन्ही राज्यात विकुरलेले अनेक समाजबांधवाना एकत्र आणण्यासाठी अशा उपक्रमाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील संत श्री. सदगुरू बागडे बाबांच्या कृपा छत्राखाली गोंधळेवाडी मठाचे मंहत बाबा महाराज यांच्या नियोजनातून अनेक सामाजिक उपक्रम राबवित अनेक समाजांना एकत्र धार्मिक कार्यक्रमाचे वर्षभर आयोजन सुरू असते. बाबा महाराज यांच्या मठात धार्मिक कार्यक्रमा बरोबरच वेगवेगळे व्यवसाय राबवून नाविन्यपुर्ण उद्योग उभारून शेकडो हातांना काम दिले जाते. शिवाय त्यापासून येणाऱ्या उत्पन्नातून वर्षभर विविध उपक्रम राबवून समाजहितासाठी प्रयत्न केले जात आहेत. मठा अंतर्गत बाबा मिनरल,हॉटेल बाबा, बाबा सर्व्हिसिंग सेंटर,बाबा पतसंस्था,बाबा मंगल कार्यालय,बाबा द्रोण व पत्रावळी,बाबा विट कारखाना (इंटरलॉकिंग),बाबा आश्रम,बाबा टाईल्स व पारटेक्स असे अनेक व्यवसाय सुरू आहेत. त्यातून शेकडो हातांना काम देण्याचे काम बाबा महाराज यांनी दुष्काळी जत तालुक्यातील गोंधळेवाडी या छोट्या गावात केले आहे. यातून मिळालेल्या उत्पन्नातूनं परिसरात सुमारे दहा एकर क्षेत्रात नंदनवन उभारले आहे. सतत समाजहित समोर ठेवत बाबा महाराज आश्रमाचे काम अंखड सुरू आहे. त्याच्या प्रयत्नातून गोंधळी समाज संघाच्या वतीने आज कर्नाटकातील कुडलसंगम ता.हुनगुंद,जि. बागलकोड(कर्नाटक) येथे सकाळी 11 वाजता भव्य मेळावा संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री सिध्दरामया बरोबरचं हभप तुकाराम महाराजही या मेळाव्याचे प्रमुख अतिथी आहेत. मेळाव्यास दोन्ही राज्यातील सुमारे दोन लाखावर समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. दिवसभर समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमास संजय दुधाळ,परशूराम मोरे,श्रींकात शिंदे,बी. व्ही. भोसले, भारती सुर्यवंशी निमंत्रक आहेत. श्री. वास्तू समृध्दी सौ. सरिता वि. लिंगायत यांनी महाराष्ट्र गोंधळी  समाजाचा नियोजनास सौजन्य केले आहे.

या मेळाव्यास दोन्ही राज्यातील हाजारो समाजबांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

ह.भ.प. तुकारामबाबा महाराज यांच्या लोकहिताच्या कामाची दखल अनेक लोकप्रिनिधिनी घेतली आहे. त्यांची चित्रमय झलक

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.