शाळेवर भरवसा नायं काय.. नामाकिंत शाळेची मुलेही खाजगी शिकवणीला:नेमके शाळेत काय कमी पडतयं ;विद्यार्थ्यांचे ‘शेड्युल टाईट’

0

जत,प्रतिनिधी: जत शहरात नामाकिंत शाळा असतानाही खाजगी क्लालेस शाळेप्रमाणे भरत आहेत. अनेक शाळातील झाडून विद्यार्थी खाजगी शिकवणीला जात आहेत. नामाकिंत संस्थेच्या शाळा असूनही खाजगी शिकवणीचा आधार घ्यावा लागतोय. त्यामुळे शाळेतील शिक्षणावर भरवसा नायं काय ?असे म्हणायची वेळ आली आहे. सध्या सर्वत्रच प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत खासगी क्‍लासेसचे पेव फुटले आहे.  बहुतांश शहरांमध्ये हेच चित्र असून क्‍लासेसला हजारो विद्यार्थ्यांची रांग दिसताना शाळा-महाविद्यालयांच्या अध्यापनाच्या दर्जाबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपयांच्या अनुदानाने पोसलेल्या शिक्षण व्यवस्थांच्या दर्जाचा प्रश्‍न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.इयत्ता 1 लीच्या आधीपासून लहान गट-मोठ्या गटालाही वेगवेगळ्या स्वरूपाची नावे देवून तशा शिक्षण व्यवस्था स्थानिकस्तरावर कार्यरत आहेत. शहरांमधील हजारो विद्यार्थ्यांसाठी खासगी क्‍लासेसचे सर्वत्र पेव फुटले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी-गणित-विज्ञान-बुद्धिमत्ता-शिष्यवृत्त्यांच्या विविध प्रकारच्या परीक्षा यासह अनेक विषयांसाठी  खासगी क्‍लासेसचा भरणा आहे. प्रामुख्याने इ. 2 री, 3 रीपासून ते इ. 12 वीपर्यंत तर मोठ्या प्रमाणावर या क्‍लासेसची व त्यामध्ये जाणार्‍या हजारो विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या क्‍लासेसच्या फी देखील रुपये 2-5 हजारांपासून ते 20-30 हजाराच्याही पुढे आहेत. आता सध्याच्या या प्रकारच्या बदलत्या शिक्षण व्यवस्थेत प्रश्‍न हा नाही की खासगी क्‍लासेसचे पेव फुटले, प्रश्‍न हा आहे की, अनुदानित शाळा-महाविद्यालयातील अध्यापनामध्ये कोणत्या त्रुटी आहेत, तिथल्या यंत्रणा-व्यवस्था-अध्यापक यांच्यावरचा पालकांचा-विद्यार्थ्यांचा विश्‍वास उडाला आहे काय? 

पाल्यांचा शाळा-महाविद्यालयात प्रवेश, पण मुलांचे शिक्षण मात्र खासगी क्‍लासमध्येच होत आहे. प्रामुख्याने अनुदानित शाळा-महाविद्यालयांमध्ये जर दर्जेदार-गुणवत्तेचे शिक्षण मिळू लागले तर विद्यार्थ्यांचा-पालकांचा वेळ, पैसा यात मोठ्या प्रमाणावर बचत होईल. पण या सध्याच्या विदारक, वास्तव चित्राचे गांभिर्य मात्र कोणाला राहिलेले नाही. शिक्षण व्यवस्थेतच, ‘खासगी क्‍लासपेक्षा आहे त्याच

Rate Card

शिक्षण व्यवस्थेत दर्जेदार व गुणवत्तेचे विद्यार्थी आम्ही घडवितो’, असा विश्‍वास देवून तो सिद्ध केला गेल्यास अनुदान पुरविणार्‍या शासनासह समाज व्यवस्था सुखावेल. तसा काही शिक्षक वर्ग आजही आहे.

पहाट ते रात्रीपर्यंत विद्यार्थी व्यस्त.गुणवत्तेने पुढे आलेल्या विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास स्वत:च्या मेहनतीबरोबरच खासगी क्‍लासेसवर अवलंबून ठेवला आहे. त्यात त्यांचाही काही दोष नाही. जर आमच्या सरकारमान्य अनुदानित शिक्षण व्यवस्थेचा अध्यापनाचा दर्जा गतीने सुधारला तर हजारो-लाखो विद्यार्थ्यार्ंचे  लाखो रुपये वाया जाणार नाहीत. त्याचबरोबर पहाटे 5-6 वाजल्यापासून ते रात्री 8-9 वाजेपर्यंत शिक्षणाच्या ध्यासाने झपाटलेल्या विद्यार्थ्यांचे ‘शेड्युल टाईट’ राहणार नाही. या पहाटे ते रात्रीपर्यंतच्या क्‍लासेस-शाळा पुन्हा क्‍लासेस या चक्रव्युहातून मुला-मुलींची केंव्हा सुटका होणार, हा प्रश्‍न आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.