जत,प्रतिनिधी:तालुक्यातील दरीबडची -तिल्याळ रस्त्यावर मोटरसायकलींची समोरा समोरा धडक झाल्याने एक जण ठार व दोनजण गंभीर जखमी झाले. विठ्ठल बसाप्पा घोडेकर(वय 55 वर्षे, रा. सिध्दनाथ) हा लाकूड व्यापारी ठार झाला. अपघात शुक्रवारी सकाळी 11.30 च्या दरम्यान झाला.
सिद्धनाथ येथील हाॅटेल चालक व लाकूड व्यापारी विठ्ठल बसाप्पा घोडेकर लाकडाचा व्यापार करून (जी ए- 01 -एल -0915) हे माेटारसायकलीवरून दरिबडचीकडे निघाले होते. तर भिमराव यल्लाप्पा शिंदे (वय-45) व अंबिका यल्लाप्पा महाजन (वय- 35, दोघे रा तिकोंडी) दरीबडचीतून (एम एच-10,बी क्यू -0581) तिल्ल्याळकडे जात होते. दोघांच्या मोटरसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यामध्ये विठ्ठल घोडेकर हे गंभीर जखमी झाले होते.डोक्यातून कानातून रक्तस्ञाव झाला होता.रूग्णवाहिके मधून जतला दवाखान्यात नेताना वाटेतच त्यांचा मृत्यु झाला. भिमराव शिंदे यांच्या तोडांला छातीला मार लागला आहे. तर अंबिका महाजन यांच्या तोंडाला मार लागला . भिमराव शिंदे यांचे तिल्याळ येथील पाहुणे मयत झाले होते. आज तिसरा दिवशी होता.रक्षाविर्जन करुन नातेवाईक यांचे कडू काढण्यासाठी दरीबडचीतून जिलेबी खरेदी करून ते तिल्याळला येत होते.त्यावेळी अपघात झाला. अपघातस्थळी जिलेबी पडली होती. दरम्यान यांच्या मालकीच्या ट्रक्टरलाही अपघात झाला आहे.





