नियमबाह्य वाहनातून विद्यार्थ्याची धोकादायक वाहतूक आरटीओ, पोलिसांचे दुर्लक्ष ;पालक, शाळाही अनभिन्न : विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेची जबाबदारी कोणाची ?

0

Image result for स्कूल बस

जत,प्रतिनिधी : शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुनियोजित आणि कार्यक्षम बससेवा देण्यासाठी शासनाने बस नियम आणि विनियम 2011 प्रमाणे विविध कायदे निश्‍चित केले आहेत. प्रत्यक्षात मात्र, शहरासह  तालुक्यातील   बहुतांश शाळा व्यवस्थापन व स्कूलबस मालकांकडून शासनाच्या नियमांचा पोरखेळ केला जात आहे. तर आरटीओची  कारवाईच नसल्याने स्कूलबसवाल्यांच्या दंडेलशाहीत अधिक भर टाकत आहे.कोणत्याही परवाना नसलेल्या,खाजगी, कालबाह्य वाहनातून,क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थी भरून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीवघेण्या प्रवासातून सोडविण्यासाठी पालक, आरटीओ आणि शाळा प्रशासनाला गांभीर्य नसल्याचे आढळून येत आहे. 

विद्यार्थ्यांची सुरक्षितपणे ने-आण करण्यासाठी पालकांकडून खासगी वाहनांऐवजी स्कूलबसला प्राधान्य दिले जाते. परंतु, नियमबाह्य वाहने, कागदपत्रांची अपूर्तता, चालक परवाना नसणे, अग्निविरोधी यंत्रणा, आपत्कालीन मार्ग, एकाच सीटवर अनेक विद्यार्थी बसविणे, तीन सीट विना परवाना रिक्षाद्वारे विद्यार्थ्यांची वाहतूक करणे, चालकाचे रॅश ड्रायव्हिंग, प्रथमोपचार पेटी उपलब्ध नसणे अशा असंख्य त्रुटी असतानाही शहरातील बहुतांश विद्यार्थ्यांचा असुरक्षित प्रवास सुरू आहे. त्याकडे पालकांसह, आरटीओ आणि शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे अनपेक्षितपणे घडणार्‍या घटनेस जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे. शासनाच्या नियमानुसार मुलांच्या सुरक्षित प्रवासासाठी मुख्याध्यापक, प्राचार्य जबाबदार आहेत. तसेच मुलांची वाहतूक होताना ती व्यवस्थित होते की नाही, हे पाहण्याची जबाबदारी त्यांची आहे. प्रत्यक्षात बहुतांश मुख्याध्यापकांना शाळेतील किती मुलांची वाहतूक स्कूल बसद्वारे होते, संबधित ठेकेदाराच्या स्कूलबसेसची आरटीओच्या नियमानुसार तपासणी झाली आहे की नाही, याची माहिती नसल्याचे वास्तव आहे. 

शहरासह तालुक्यातील बहुतांश पालकांची मानसिकता मूल स्कूल बसमध्ये बसविले की, जबाबदारी संपली अशी आहे. त्यामुळे स्कूलबस चालक, बसचा वेग, दप्तर ठेवण्याची जागा, केअर टेकर याची तपासणी केली जात नाही. त्यामुळे केवळ व्यवसायाच्या हितासाठी केली जाणारी विद्यार्थी  वाहतूक धोकेदायक ठरत आहे. प्रत्येक शालेय प्रशासनाने त्यांच्या शाळेतील मुला-मुुलींची योग्य रकमेची सर्व समावेशक विमा पॉलिसी काढणे बंधनकारक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या शालेय शुल्कातून देय रक्कम वसूल करणे गरजेचे आहे. मात्र, शाळा प्रशासनाच्या वतीने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले  आहे. प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी पालकांचा अट्टाहास विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबद्दल सक्षम नाही. परिणामी अवघ्या काही किलोमीटरच्या प्रवासात विद्यार्थ्यांना यातना सहन कराव्या लागत आहेत. दरम्यान, दिवसेंदिवस स्कूल बसवाल्यांची वाढणारी दंडेलशाही आरटीओच्या आवाक्याबाहेर चालली आहे.

Rate Card

कान्वेट स्कूलची फँशन 

दुर्लक्षीत ,दुष्काळी स्थिती असतानाही आपले पाल्य चांगले शिक्षण घेतले पाहिजे,अशी मानसिकता पालकांची असल्याने प्रंसगी पोटाला पिळ घालून येथील पालक इग्लिंश मिडियम स्कूल मध्ये आपली मुले घालत आहेत. त्यामुळे जत शहरासह तालुक्यातील कॉन्वेट स्कूलची संख्या व विद्यार्थी झपाट्याने वाढले आहेत. त्याच्यांकडून स्कूल बस नियमाची पायमल्ली होत अाहे.काही शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यात मग्न संस्था चालक नियमबाह्य वाहनातून विद्यार्थी  ने -आण करत आहेत.अनेक शाळांकडे स्कूल बस परवाना नसल्याचे चित्र आहे. तर अनेक शाळांना खाजगी वाहनाचा वापर केला जात आहे. मात्र तिक्ष्ण आरटीओ व पोलिसाची यावर नजर पडत नाही हे विशेष…

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.