जत नगरपालिकेची निवडणूक भाजप स्वबंळावर लढणार : आ. जगताप

0

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेची निवडणूक भाजप स्वबंळावर लढविणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या भष्ट्र कारभाराविरोधात जनतेत असंतोष आहे. त्यामुळे यावेळी भाजपचाच नगराध्यक्ष विजयी होईल असे प्रतिपादन आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत केले.

यावेळी भाजप नेते डॉ.रविंद्र आरळी, अॅड.श्रीपाद अष्टेकर,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,प्रभाकर जाधव, उमेश सांवत,विजय ताड आदि मान्यवर उपस्थित होते.

Rate Card

जगताप पुढे म्हणाले, जत नगरपालिकेत सत्ताधारी गटाच्या भष्ट्राचार मुळे जतचा विकास खुंटला आहे. आता सुरू कामेही जिल्हानियोजन मधून सुरू आहेत. नगरपालिकेतून दिसण्याजोगे विकास कामेच झाली नाहीत. त्यामुळे यंदा परिवर्तन अटळ आहे. लोकानुभूक व लोकहिताची कामे करणारे भाजपच जतचा विकास करू शकते. त्यामुळे जत नगरपालिकेत यावेळी राज्यातील घटक पक्ष रिपाइं,रासप यांना सामावून घेत भाजप स्वबंळावर लढणार आहे. लोकातून आलेल्या व स्वच्छ कार्यकर्त्याला उमेदवारी देऊ असेही आमदार जगताप म्हणाले.

डॉ. रविंद्र आरळी म्हणाले, जत नगरपालिकेत विकास कामापेक्षा भष्ट्राचार जादा झाला आहे.गटारी बांधल्या म्हणजे विकास होत नाही. अनेक नियमबाह्य काम झाली आहेत. त्यामुळे निधी वाया गेला आहे.जतचा विकास करण्यासाठी केंद्र राज्य,जिल्हा ते नगरपालिकेत भाजपची सत्ता आणा.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.