जत,प्रतिनिधी : कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरेपाटील आज जत तालुक्यात प्रथमच येत आहेत.
जत विभागातील कवटेमहांकाळ, जत व उमदी पोलिस स्टेशन व विभागीय कार्यालयाची विशेष तपासणी नांगरेपाटील करणार आहेत. जत विभागातील पोलिस ठाण्यातील गुन्ह्याची कागदपत्रे,गुन्ह्याचा तपास,अधिकारी भेट,जनता दरबार,कार्यालयाची तपासणी,आढावा बैठक,व उपविभातील पोलिसाकडून राबविलेल्या चांगल्या कामिगिरीचाही यावेळी आढावा घेण्यात येणार आहे.
बहुचर्चित व्यक्तिमहत्व म्हणून राज़्यभर महानिरिक्षक विश्वास नांगरेपाटील परिचित आहेत. त्यामुळे त्यांच्या जत दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. जत सारख्या दुर्लक्षीत,सिमावर्ती भागातील कायदा सुव्यवस्थेचा ते आढावा घेतिल. पुर्ण दिवसभर जत तालुक्यात नांगरेपाटील यांचा तळ असणार आहे.





