अनधिकृत सावकारी व्यवसायावर युद्धपातळीवर कारवाई करा – जिल्हाधिकारी वि. ना. काळम

0

अनधिकृत सावकारी व्यवसायावर युद्धपातळीवर कारवाई करा

-जिल्हाधिकारी वि. ना. काळम

– पुराव्यानिशी लेखी तक्रार देण्याचे आवाहन

सांगली : शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमिवर अनधिकृत सावकारी व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तिकरीत्या युद्धपातळीवर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे दिले.

Rate Card

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 ची अंमलबजावणी योग्य रीतीने होण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. 

अनधिकृत सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तिंवर कारवाई करण्याच्या उद्देशाने तसेच सावकारी व्यवसायावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी  ही त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. अध्यक्षांव्यतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक समितीचे सदस्य तर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था समितीचे सदस्य सचिव आहेत. 

जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, अवैध सावकारीसंदर्भात तक्रार असल्यास, नागरिकांनी परिस्थितीजन्य पुराव्यानिशी लेखी जिल्हा उपनिबंधक आणि पोलीस स्थानकात तक्रार द्यावी. तसेच अवैध सावकारी रोखण्यासाठी समितीनेही भरारी पथके निर्माण करावीत. अनधिकृत सावकारांवर पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकाव्यात. अवैध सावकारीविरूद्ध कार्यवाहीत सुसूत्रता आणावी. मानवी जीवन अनमोल आहे. त्याचाशी कुणीही खेळू नये. या बाबत आलेल्या तक्रारींची छाननी करून आवश्यक तेथे कडक कारवाई करा. याबाबत पोलीस विभागाने सर्व पोलीस स्थानकांना लेखी सूचना द्याव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.