वळसंगची क्रिडा कन्या : खुशबु मुजावर जिम्नॅस्टिक्स व मैदानी खेळ प्रकारात अनेक पदकांची कमाई

0
3

वळसंगची क्रिडा कन्या : खुशबु मुजावर

जिम्नॅस्टिक्स व मैदानी खेळ प्रकारात अनेक पदकांची कमाई

   

वळसंग, वार्ताहर :

जत तालुका कितीही दुष्काळी असला तरीही विद्यार्थी असो वा खेळाडू आपलं प्राविण्य दाखवत त्या त्या विभागात यशस्वी होत असतात. वळसंग गावातल्या अशाच खुशबु या मुलीने आत्ता पर्यंत विविध जिम्नॅस्टिक व मैदानी खेळ प्रकारात विविध पदके मिळवत गावाचे नाव राज्यात उत्तुंग केले आहे.

वळसंगची क्रीडा कन्या खुशबु हिने सन-17-18 च्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद औरंगाबाद आयोजित राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धेत सांघिक तृतीय क्रमांक पटकावला तसेच याचप्रकारच्या राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात यामध्ये जिम्नॅस्टिक, मैदानी, विविध कला-गुण विभागात प्राविण्य मिळवले आहे. तिच्या या खिलाडू वृत्तीचे आणि यशस्वी वाटचालीचे शाळेतून व गावकऱ्याकडून कौतुक होत आहे. 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here