सातव्या वेतन आयोग त्वरीत लागू करावा – ग.दि.कुलथे

0

सातव्या वेतन आयोग त्वरीत लागू करावा – ग.दि.कुलथे


Rate Card


मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – केंद्राच्या धर्तीवर राज्य शासनातील अधिकारी व कर्मचा-यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत शासनाची सकारात्मक भूमिका असली तरी तो त्वरीत लागू करावा अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाचे सल्लागार ग.दि.कुलथे यांनी केली. आज कोकण भवन येथील राजपत्रित अधिकारी महासंघाच्या समन्वय बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस कोकणभवन येथील विविध कार्यालयाचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

कुलथे म्हणाले की, सेवा हमी कायदा, रिक्त पदे, पाच दिवसाचा आठवडा, पगारात भागवा अभियान,सेवा निवृत्तीचे वय, बाल संगोपन रजा,प्रशंसनीय कामाबद्दल आगावू वेतनवाढ,अधिका-यांच्या पाल्यांना अनुकंप सुविधा याबाबत शासनामध्ये जी कार्यवाही सुरू आहे. अधिकारी महासंघाच्या पाठपुराव्यानंतर शासनाच्यावतीने  महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी बांद्रा पूर्व येथे  1381 चौ.मी. चा भूखंड मिळाला आहे. ही वास्तू आपल्यासाठी होणार आहे. त्यामुळे सर्व अधिका-यांनी ही वास्तू उभारणीसाठी जास्तीत जास्त वर्गणी देऊन सहकार्य करावे. महासंघाच्या ‘पगारात भागवाʼ या अभियानास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या अभियानामुळे प्रशासनात काम करणा-यांच्या मानसिकतेत बदल होत आहे. या अभियानामुळे लोकांमध्ये चांगला संदेश गेला आहे व त्याचे परिणाम ही दिसत आहेत. असेही  ते म्हणाले. या बैठकीस उपायुक्त (विकास) गणेश चौधरी, उपसंचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे,  डॉ.व्यंकट धर्माधिकारी उपाध्यक्ष, बा.ना. सबनीस सदस्य, ह.ना. सोनावणे, सीताराम काळे, कोषाध्यक्ष, लक्ष्मण धुळेकर सचिव, कोंकण भवन समन्वय समिती, शिवाजी किनवडेकर, विक्रीकर सहआयुक्त, श्रीमती  वसुधा धुमाळ, विक्रीकर उपायुक्त जयंत चावरे, विक्रीकर उपायुक्त, सुबोध लवटे, विक्रीकर अ. संघटना, दुर्गा महिला पथकाच्या अध्यक्षा मीना आहेर आदि अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.