ग्रामीण आरोग्यसेविकांची मुख्यालयाला दांडी रात्री-बेरात्री रुग्णांचे हाल : वरिष्ठ अधिकार्‍यांचेही दुर्लक्ष, गावात सुसज्ज निवासस्थाने असतानाही शहराकडे धाव

0

ग्रामीण आरोग्यसेविकांची मुख्यालयाला दांडी

रात्री-बेरात्री रुग्णांचे हाल : वरिष्ठ अधिकार्‍यांचेही दुर्लक्ष, गावात सुसज्ज निवासस्थाने असतानाही शहराकडे धाव

जत- का. प्रतिनिधी : जत तालुक्यातील गावागावात उभारण्यात आलेल्या आरोग्य बहुतावंश उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेविका उपस्थित राहत नाही. परिणामी रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घ्यावी लागते. प्रशस्त निवासस्थान बांधून दिल्यानंतरही आरोग्य सेविका मुख्यालयाला दांडी मारतानाचे चित्र आहे. कायम दुष्काळ पाचवीला पुजलेल्या जत तालूक्यातील जनतेच्या आरोग्याचा उपचाराचाही कृत्रीम दुष्काळ आहे.

जत तालुक्यातील गरीब नागरिकांना वेळेवर उपचार व्हावे यासाठी राज्य शासनाने ग्रामीण भागातसुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रे याच्या शाखाची निर्मिती केली आहे. उपकेंद्राचा कारभार रामभरोसे सुरू असून, त्यातच आरोग्य सेविका, परिचारिका तसेच परिचर चौकीदार यांनी शासनामार्फत आरोग्य केंद्रातच व मुख्यालयी राहण्याचे आदेश असून, देखील या नियमाची पायमल्ली केली जात आहे. पावसाळ्य़ाच्या दिवसामध्ये ग्रामीण भागातील गरीब श्रमजिवी जनता या हलगर्जी धोरणाला कंटाळून वेळेवर उपचार होत नसल्याकारणाने रोष व्यक्त केल्या जात आहे.

सध्या पावसाळ्य़ाचे दिवस सुरू झाले असून, पावसाळ्यात अनेक ठिकाणी लहान लहान डबके भरून वाहत राहात असून, साचलेले पाणी दूषित होऊन त्याचा दुर्गंध पसरत आहे.गावातील अस्वच्छतेमुळे पाण्याचे साठे दूषित होऊन त्यापासून कॉलरा, गॅस्टो, काविळ, विषमज्वर, ताप, मलेरिया डेंग्यू यासारख्या रोगानी ग्रामीण जीवन गरीब जगत आहे. यासारख्या रोगाची लागण होते.अशा परिस्थितीत ग्रामीण आरोग्य केंद्रात आरोग्य सेविकांची उपस्थिती आवश्यक असते. परंतु आरोग्य सेविका शहराच्या ठिकाणी राहून कारभार पाहतात. परिणामी गावात समस्या निर्माण होते. वरिष्ठही याकडे लक्ष देण्यास तयार नाही. आरोग्य विभागातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, परिचर, चौकीदार, शिपाई हे या पावसाळ्याच्या दिवसा तरी मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यात यावी, अशी मागणी जत तालुक्यातील नागरिक करीत आहे. वरिष्ठ या प्रकरणी काय निर्णय घेतात याकडे लक्ष सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामीण भागामध्ये रात्री-बेरात्री एखाद्या रुग्णाला तात्काळ दवाखान्यात आणून उपचार करणे गरजेचे असल्यास त्याला रात्रीच्या वेळेवर उपचार होत नाही. त्यासाठी शासनाकडून गोरगरीब जनतेचा वेळेवर उपचार करण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून अनेक गावामध्ये आरोग्य उपकेंद्राची व्यवथा केली आहे. परंतु तेथी परिस्थिती ही अत्यंत दयनीय अवस्थेत असून, संख,कोतेबोबंलाद,माडग्याळ,उमदी,येळवी, शेगाव,बिंळूर,जत,डफळापूर,वंळसग ‘या ठिकाणच्या आरोग्य केंद्रातून आरोग्य सेवा पुरविल्या जातात . ‘या केंद्रा अतर्गत पाच- सहा उपकेंद्र असतात. काही केंद्रात कर्मचारी मुक्कामी राहत आहेत.मोठय़ा ग्रामीण खेड्यामध्ये देखील मनुष्यबळाचा वापर कमी आहे. त्यामध्ये डॉक्टर हे वेळेवर उपस्थित राहत नाही, राहिलेच तर आपल्या वेळेवर पाहिजे ते कामे करून शहरी भागाकडे निघून जातात या सर्व प्रकाराचा मन:स्ताप मात्र ग्रामीण जनतेला सहन करावा लागतो. वरिष्ठ अधिकारीही या प्रकाराकडे कायम दुर्लक्ष करतात. रात्री-बेरात्री उपचारच मिळत नाही काही वैधकीय अधिकारी स्थानिक लोकाना हाताशी धरून नागरिकावरच अरेरावी करत असल्याचे अनेक रुग्ण सांगतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.