बेळोंडगी ते उटगी रस्त्याची दुरुस्ती करा : बोरामनी
उमदी,वार्ताहर:बेळोंडगी ते उटगी या सहा किमी अंतराचा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सर्वत्र खड्ड्यानी खड्डेयुक्त बनला असून या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी सोमनिंग बोरामनी यांनी केली आहे.
बेळोंडगी हे गांव राजकीयदृष्ट्या तालुक्यातील संवेदनशील गांव असून या गावात श्री. मलकारसिध्द देवाचे प्रसिध्द देवस्थान व शाळा कॉलेज असल्याने विद्यार्थी ,शेतकरी,व भाविकांची सतत ये -जा असते.तसेच तालुक्याच्या ठिकाणी कामासाठी दररोज येथील नागरिक या मार्गावरून ये -जा करत असतात. मात्र बेळोंडगी ते उटगी खड्डयुक्त रस्त्याने मुत्यू मार्ग बनला आहे. परिणामी खड्ड्यातील दणक्याने येथील लोकांनी आपला मार्गच बदलला आहे. बेळोंडगी -हळ्ळी- उमदी उटगी असा एकूण वीस किमी अंतराचा प्रवास करावा लागत आहे.हा रस्ता नव्याने केल्यास अंतर कमी होईल, त्यामुळे वेळ व पैसा वाचणार आहे. मात्र बेळोंडगी ते उटगी रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी कोणताच लोकप्रतिनिधी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. यापूर्वी देखील येथील नागरिकांनी संबधित विभागाला कळविले आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधीनी लक्ष देत बेळोंडगी ते उटगी रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी सर्व सोसायटीचे विद्यमान चेअरमन सोमनिंग बोरामनी यांनी केली आहे.





