वाळू उपसा बंदी हटवावी मागणीसाठी जतेत उपोषण

0

वाळू उपसा बंदी हटवावी मागणीसाठी जतेत उपोषण

जत,(प्रतिनिधी);वाळू उपशावर बंदी घातल्याने जत शहरासह तालुक्यातील बांधकामे बंद आहेत.यामुळे यासंबंधीत असलेले कामगारांवर काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.या बंदी उठवावी म्हणून जत तालुका कॉट्रक्टर असोसिएनच्या वतीने आमरण उपोषणास सुरूवात करण्यात आली.तत्पुर्वी जत शहरातून भव्य रँली काढण्यात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात 

Rate Card

आला.सांगलीचे जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी वाळू उपशावर बंदी घातल्याने व प्रशासनाला कडक धोरण राबवण्याबाबत सक्त आदेश दिल्याने जिल्ह्यात वाळू उपसा बंद झाला असून यामुळे सरकारी आणि खासगी बांधकामे वाळूअभावी बंद पडले आहेत. त्यामुळे गवंडी,मजूर,सेन्ट्रिन्ग कामगार यांना काम नाही. काम नसल्याने त्यांची उपासमार होऊ लागली आहे. वाळू उपसा बंदी उठवावी यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर हे उपोषण सुरू राहिल असे असोसिएशनचे अध्यक्ष सलीम गवंडी यांनी सांगितले.सर्व शासकीय व खाजगी कामे स्टोन क्रेसर बंद असल्याने खडी मिळत नसल्याने बंद आहेत.त्यामुळे स्टोन क्रेसर सुरू करावे,

गेली चार महिने कामे बंद असल्याने मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना बेकार भत्ता द्या.कागदपत्राची पुर्तता करूनही नगरपालिके कडून बांधकाम परवाना मिळत नाही. तो मिळावा.बांधकाम मंजूराना शासकीय योजनेचा लाभ मिळावा आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.

 जत: वाळू बंदी हटवावी मागणीसाठी जत कॉट्रक्टर असोसिएनच्या वतीने भव्य मोर्चा काढत उपोषणास सुरूवात करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.