भाजपने भुलथाफा देऊन देशवासियांना फसविले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात : कॉंग्रेसच्या जत तालुक्यातील नुतन संरपच, सदस्याचा सत्कार

0

भाजपने भुलथाफा देऊन देशवासियांना फसविले

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणाचा घणाघात : कॉंग्रेसच्या जत तालुक्यातील नुतन संरपच, सदस्याचा सत्कार 

जत,प्रतिनिधी : मोठी आश्वासने देत सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारच्या काळात सर्वाधिंक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. सरकारचे सर्व स्तरावरची धोरणे शेतकरी विरोधी आहेत. कर्जमाफी,नोटाबंदी, जिएसटी योजना फसव्या आहेत. लाभाच्या योजनेसाठी जनतेला ऑनलाईनच्या नावाखाली वेठीस धरणाऱ्या सरकारचे दिवस संपले आहेत. त्यांची सुरूवात ग्रामपचांयत निवडणूकीतून झाली आहे.असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ते जत येथे तालुका कॉग्रेस कमिटीकडून आयोजित नुतन संरपच व सदस्याच्या सत्कार समारंभ प्रंसगी बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, युवक प्रदेशअध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील,माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, कॉग्रेस नेते विक्रम सांवत आदि मान्यवर उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, जत सारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या माध्यमातूनही सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यायचे सोडून त्यांच्या सहनशीलतेशी खेळण्याचा

प्रयत्न केला. अजूनही प्रक्रियेतील गोंधळ संपलेला नाही. आघाडीच्या काळातील कर्जमाफीत झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा भाजप सरकार जाणीवपूर्वक उपस्थित करीत आहेत. आमच्या काळात असे चुकीचे पैसे कोणाला दिले असतील तर सरकारने चौकशी करून संबंधितांवर जरूर कारवाई करावी, असे ते म्हणाले.

गुजरात निवडणूक डोळ्यासमोर बुलेट ट्रेन आणून महाराष्ट्रावर पन्नास टक्के बोजा लादला आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रात बुलेट ट्रेन पंचवीस टक्के भागातून जाते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी एका राष्ट्रियकृत बँकेच्या आकडेवारीतील तफावतीची कबुली दिली. या बँकेने कर्जमाफीसाठी लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या सुरुवातीला 6 लाख 50 हजार सांगितली होती. काही दिवसातच या बँकेने हा आकडा दीड लाखावर आणला. इतकी मोठी तफावत एका राष्ट्रियकृत बँकेच्या आकडेवारीत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. केंद्रीय अर्थमंत्री, अर्थखाते तसेच राज्य शासनाने याबाबत खुलासा करावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

प्रदेशअध्यक्ष डॉ. विश्वजित कदम म्हणाले, कॉग्रेसला पुन्हा गत वैभव मिळवून देणारा जतचा हा ऐतिहासिक सोहळा आहे. त्यांची सुरूवात ग्रामपचांयत निवडणूकीतून झाली आहे. नव्याने निवडून आलेल्या संरपचव सदस्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या निधीचा योग्य वापर करून गावच्या समस्या सोडव्यात,राजकीय इतिहासात अनेक नेते ग्रामपंचायतच्या चळवळीतून तयार होऊन राज्य,देशाचे नेते बनले आहेत. त्यामुळे हातात आलेल्या पद सार्थकी लावावे,राज्यातील सरकाने जत तालुक्यातील जनतेचा घोर अपमान केला आहे. राज्य,केंद्र व स्थानिक आमदार सत्ताधारी पक्षाचा असतानाही पाणी,रस्ते,असे कळीचे प्रश्न कायमं आहेत. कॉग्रेस सरकारच जतला न्याय देऊ शकते.महिला सदस्यांना सल्ला देताना कदम म्हणाले, महिलांनी घरात जसे बोलता तसेच ग्रामपचांयतीत बोलावे.तरचं आपली निवड सार्थ ठरेलं. सरकारविरोधात कुणी काही बोलले की त्यांच्या घरावर छापे टाकले जातात, खोट्या बातम्या जाणीपूर्वक पेरल्या जातात. एका नेत्यावर कारवाई झाली की बाकीचे दहशतीखाली येतील, असा विचार या कारवाईमागे असतो. त्यामुळे अत्यंत वाईट राजकारण महाराष्ट्रात व देशात भाजपच्या माध्यमातून सुरू झाले आहे.त्यांच्या या राजकारणाला आता जनताच योग्य धडा शिकवेल. त्याची सुरुवात ग्रामपंचायत निवडणुकीतून सुरू झाली आहे.त्यांत जत तालुक्यातील जनतेनी मोठा वाटा उचलला आहे. असे कदम शेवटी म्हणाले

Rate Card

आ.मोहनराव कदम म्हणाले,कॉग्रेसला साथ देणारा जत तालुका आहे. जत तालुक्यातील जनतेनी कायम कॉग्रेसवर विश्वास दाखविला आहे. तो सार्थ ठरवू 

जत तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेल्या कॉग्रेेेसच्या संरपच व सदस्याच्या सत्कार समारंभ जत येथे संपन्न झाला.

 प्रस्ताविक ,आप्पाराय बिराजदार,स्वागत नाना शिंदे, भैय्या कुलकर्णी,प्रांरभी जत तालुक्यात कॉग्रेसच खात उघडणाऱ्या मोकाशवाडी ग्रामपंचायतीच्या संरपच,सदस्याचा सत्काराने सत्कार सोहळ्यास सुरूवात झाली. तालुक्यातील कॉग्रेसच्या 43 ग्रामपंचायतीच्या संरपच व सदस्याचा सत्कार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा अध्यक्ष आ. मोहनराव कदम,युवक प्रदेशाध्यक्ष  विश्वजित कदम,कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांच्या हस्ते श्रीफळ,पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.विक्रम सांवत म्हणाले, आघाडी शासनाने मोठा निधी दिला आहे. कॉग्रेसच्या शासनाचे जत तालुक्यातील जनतेवर प्रेम आहे.त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूकीत कॉग्रेसची सर्वाधिंक ग्रामपंचायतीवर सत्ता आली आहे. जत पुर्व भागातील कन्नड,मराठी भाषेमुळे त्या भागाचा विकास झाला नाही. पाणी टंचाईमुळे आम्हाला दुष्काळी भाग म्हणून ओंळख आहे. गेल्या तिन वर्षात भाजप सरकारच्या योजना फसव्या राबविल्या. कॉग्रेसच्या शासन काळात झालेल़्या विकास योजनाच्या पुढे जत शहरासह तालुक्याचा विकास झालेला नाही. यापुढेही कॉग्रेसच जतला नवी ओळख देईल. कॉग्रेस विचाराची येत्या निवडणूकीत जत नगरपालिकेत सत्ता असेल असेही विक्रम सांवत यांनी शेवटी सांगितले.यावेळी जि.प. सदस्य महादेव पाटील, सौ. कलावती गौरगोंड,बाजार समिती सभापती अभिजित चव्हाण, उपसभापती रामगोंडा संत्ती,माजी सभापती संतोष पाटील,पंचायत समिती सदस्य रविंद्र सांवत,दिग्विजय चव्हाण, सौ. लता कुळ्ळोली,नगराध्यक्ष इकबाल गंवडी, उपनगराध्यक्ष श्रींकात शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

फोटो

जत तालुक्यातील कॉग्रेसच्या नुतन संरपच,व सदस्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाजूस युवक प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, आ. मोहनराव कदम,विक्रम सांवत आदि

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.