नगपालिका हद्दीतील विविध विकासकामाचे उद्धाटन

0

नगपालिका हद्दीतील विविध विकासकामाचे उद्धाटन

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिका हद्दीतील विठ्ठल नगर,चर्मकार वस्ती,डफेदार गल्ली,मदारी वस्ती,शिक्षक कॉलनी साळे वस्ती,बसवेश्वर नगर,लक्ष्मी नगर रस्ते व हिंदू स्मशाभूमीतील शवदाहिनी 

आदी विविध विकास कामाचे उद्घाटन कॉग्रेस नेते तथा जिल्हा बँक संचालक विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पाराय बिरादार, माजी.पं.स.सदस्य पिराप्पा माळी,नगराध्यक्ष इकबाल गवंडी,नगरसेवक सुजय नाना शिंदे,महादेव कोळी,परशुराम मोरे,मुन्ना पखाली,भैरू माळी,सौ.माया साळे,सौ.शारदा कुंभार,सौ.बेबिताई चव्हाण,सौ.शुभांगी बन्ने,सौ.संगीता माळी,अशोक बन्नेनवर,इरणां निडोनी,निलेश बामने,प्रकाश व्हनमाने,सर्व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

जत शहरात विकासकामातून जत शहराला विकास कामे शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. शहरातील जनतेनी आमच्यावर दाखविलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी आमचे प्रतिनिधी काम करत आहेत. गेल्या पाच वर्षात नगपालिकेत प्रभावी काम केले आहे.यापुढेही शहरात विकासकामातून वेगळेपण जपू,शहरातील रस्ते मजबूत करण्यासाठीचे काम सुरू आहे. हिंदू स्मशान भूमितील शवदाहिनी मुळे अत्यसंस्कारच्या वेळी सोय होणार आहे. असे यावेळी विक्रम सांवत यांनी सांगितले.

जत: नगरपालिका हद्दीतील विविध विकासकामांचे उद्धाटन कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांच्या करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.