लायन्स क्लबच्या “आदर्श शिक्षक” पुरस्काराचे रविवारी वितरण

0
8

सुभाष शिंदे,दिलिप वाघमारे, राजू कोळी,शरण्णाप्पा जावीर,निर्मला मोरे,अनुराधा संकपाळ मानकरी

जत,प्रतिनिधी:लायन्स व लायनेस क्लब जतच्या वतीने दरवर्षी दिला जात असलेले लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कारा 2017 चे वितरण रविवार ता. 29 रोजी सायंकाळी 6 वाजता आरळी नर्सिंग कॉलेज जत येथे आयोजित केल्याची माहिती डॉ. रविंद्र आरळी यांनी दिली.

जत शहरातील वैद्यकीय व व्यवसायातील सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या लायन्स क्लबच्या वतीने सतत जत शहरासह तालुक्यातील विविध गावात सामाजिक उपक्रम राबवत वेगळेपण जपले आहे. समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या लायन्स व लायनेस क्लबच्या वतीने लोकहितासाठी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांना दरवर्षी      “लायन्स आदर्श शिक्षक” पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षीही तालुक्यातील 6 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

तालुक्यातील सुभाष सदाशिव शिंदे(जत हायस्कूल,जत),दिलिप मारोती वाघमारे(प्राथमिक शाळा बाबरवस्ती,पांडोझरी),राजू तुकाराम कोळी(रामराव विद्यामंदिर,प्राथमिक शाळा),शरण्णाप्पा यल्लाप्पा जावीर(जि.प. कन्नड शाळा,खोजानवाडी),निर्मला वंसतराव मोरे(राजे रामराव महाविद्यालय,जत) अनुराधा संकपाळ (योग शिक्षिका)

हे लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार 2017 चे मानकरी ठरले आहेत.

या पुरस्काराचे वितरण रविवार ता.29 ला आमदार विलासराव जगताप, आमदार अनिल बाबर,लायन्स क्लबचे प्रांतपाल वासुदेव कलगटगी,रिजन चेअरमन प्रा. एन.ए.एनामदार,डॉ. रविंद्र आरळी (प्रांतीय सभापती),ला. रांजेद्र आरळी (झोन चेअरमन)आदि मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. यांचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here