सत्तांतर होताच पेयजल योजनेचा निधी परस्पर वर्ग करण्याचा प्रयत्न संखमधील प्रकार : गैरवापर होण्याची शक्यता; चौकशीची मागणी

0

सत्तांतर होताच पेयजल योजनेचा निधी परस्पर वर्ग करण्याचा प्रयत्न

संखमधील प्रकार : गैरवापर होण्याची शक्यता; चौकशीची मागणी

Rate Card

संख,वार्ताहर :संख ग्रामपचांयतीत सत्तांतर होताच मागील सत्ताधारी गटाकडून राष्ट्रीय पेयजल योजनेचा  ग्रामपंचायत खात्यावरील निधी सत्ता जाताच परस्पर पेयजल योजनेच्या खात्यावर वर्ग करण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यात गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे योजनेचे खाते बंद ठेऊन निधी रोकावा या मागणीचे निवेदन चंद्रशेखर रेबगोंड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना दिले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे. योजनेच्या कामाची चौकशीसाठी सर्व कागदपत्रे पंचायत समितीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जत यांच्याकडे आहे. मात्र सत्ता जाताच हा निधी योजनेची कोणतीही चौकशी न करता पंचायत समितीच्या संबधित अधिकाऱ्यांशी संगनमत निधी वर्ग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच योजनेची कोणतीही चौकशी न करता कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे दिली आहेत.योजनेचे बंद खातेही चालू करण्यात आले आहे. त्यामुळे योजनेचा ग्रामपंचायतीच्या खात्यावरील निधी परस्पर पेयजल योजनेचा खात्यावर वर्ग करून गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुर्ण चौकशी करेपर्यत निधी रोकावा अशी मागणी रेबगोंड यांनी निवेदनात शेवटी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.