शाळांमधील शुद्ध पाण्यासाठी 14 व्या वित्तनिधीचा वापर करा: रवी-पाटील

0

शाळांमधील शुद्ध पाण्यासाठी 14 व्या वित्तनिधीचा वापर करा: रवी-पाटील

जत,(प्रतिनिधी);

राज्यातल्या ग्रामपंचायतींना केंद्राकडून देण्यात येणार्‍या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीपैकी शिक्षण आणि आरोग्य सेवेसाठी 25 टक्के निधी वापरणे बंधनकारक आहे. त्यामुळे या निधीचा वापर करून जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळांमधील पेयजल योजनेसाठी वापरण्यात यावा, अशा सूचना ग्रामपंचायतींना दिले असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील यांनी दिली.

Rate Card

याबाबत नुकत्याच झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीतही निर्णय झाला असल्याचे सांगून श्री.रवी-पाटील म्हणाले की,ग्रामपंचायतींना गावातल्या शैक्षणिक उन्नतीसाठी चौदाव्या वित्त आयोगातील उपलब्ध निधीपैकी 25 टक्के निधी गावातल्या प्राथमिक शाळा व अंगणवाडीसाठी वापरावयाचा आहे. यातून शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. गतवर्षी आलेल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतील रक्कम जिल्ह्यातल्या बहुतांश ग्रामपंचायतींनी शाळांसाठी वापरला नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही मोठी गंभीर बाब असून ग्रामीण भागात शाळांना अजून बर्‍याच सुविधांची वानवा आहे. पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट आहे. त्यामुळे शाळांमधील शुद्ध पाण्यासाठी ग्रामपंचायतींनी निधी वापरून शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी. याबाबत जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांच्यामार्फत तातडीने आदेश काढला जाईल, असेही श्री. रवी-पाटील यांनी सांगितले.

यावेळी बोलताना श्री.रवी-पाटील यांनी जिल्ह्यातल्या धोकादायक शाळा इमारतीचा मुद्दा स्पष्ट केला. ते म्हणाले जिल्ह्यात 309 शाळांच्या इमारती धोकादायक आहेत.याबाबत सुमारे 2 कोटी 50 लाख रुपयांची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे करण्यात आली असून त्यांच्याकडून तुर्तास 1 कोटी 60 लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे,मात्र यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.