बेळोंडगी ग्रा. पं. स्थापने पासून यंदाच सत्तातंर -सोमनिंग बोरामनी
उमदी,वार्ताहर:बेळोंडगी (ता. जत) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस प्रणीत कल्पना बुरकुले या निवडून आल्या आहेत. तर भाजपाच्या सुमित्रा हलकुडे यांच्या पराभवामुळे कल्लाप्पा हलकुडे यांच्या नेतृत्वाला धक्का बसला आहे. पंचायत समिती सदस्य धरेप्पा हत्तळ्ळी व पं. स. निवडणूक अपक्ष लढलेले व सोसायटीचे विद्यमान चेअरमन सोमनिंग बोरामनी यांनी एकत्र येत ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपचे असलेले गुरुसिध्द बुरुकुले यांच्या पत्नीला सरपंच पदाची उमेदवारी कॉग्रेेेसकडून देऊन विजयी करण्याचा करिष्मा केला आहे.
सतत सत्तेत असलेल्या सत्ताधारी गटा विरोधातील नाराजी भेदत विजयात रुंपात्तर केले आहे. गत पंचायत समिती निवडणूकीत भाजपने उमेदवारी नाकारल्याने मी अपक्ष लढलो होतो.त्यामुळे मला माननारा गट माझ्याबरोबर आहे. आमची ताकत दाखवत बेंळोडगीत सत्तांतर केले आहे. शिवाय इतर गावातही माझ्या समर्थकांनी पाठींबा दिलेले उमेदवार विजयी झाले आहेत.यापुर्वीही बोरामणी यांच्या ताब्यातील सत्ता काढून घेण्यासाठी विरोधी गटाकडून प्रयत्न झाले मात्र सभासदानी बोरमणी यांच्यावर विश्वास दाखवित सोसायटीची सत्ता कायम ठेवली आहे.बोरामणी यांच्या कॉंग्रेस गोटात येण्यामुळे काहीजण नाराज होत विरोधी गटाकडे गेले,तरीही प.स.सदस्य धरेप्पा व बोरामणी यांनी ग्रामपंचायतीचा सत्ता मिळवित कॉग्रेेेसचा झेंडा फडकाविला.
चौकट :
येत्या काळात जनतेच्या विचारांनी ज्या पक्षात सन्मान मिळेल त्या पक्षाचा झेंडा हातात घेणार आहे.
सोमनिंग बोरामणी,विद्यमान सोसायटी चेअरमन





