एसटीचा संप मिटला,जतमधून सांगलीसह अन्य बसेस रवाना

0
9

एसटीचा संप मिटला,जतमधून सांगलीसह अन्य बसेस रवाना

जत,प्रतिनिधी: गेल्या पाच दिवसापासून एसटी कर्मचाऱ्याचा सुरू असलेला संप अखेर मिटला आहे.जत तालुक्यातील पुर्व भागातील अनेेेक गावाचे दळणवळण बंद पडलेे होते. बऱ्याच

वाहतूकीच्या सोयी नसल्याने गावाबाहेर जाता येत नव्हते.आज (शनिवारी) सकाळी जत बसस्थानकातून सांगलीसह अनेक गावांना जाणाऱ्या एसटी बसेस सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. संप मागे घेतल्याचे समजताच प्रवाशांनी बसस्थानकात गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे.

काल (शुक्रवारी) उच्च न्यायालयाने संप नियमबाह्य ठरविल्याने व सरकारने तातडीने तोडगा काढावा असे आदेश दिल्याने रात्री उशिरा कर्मचाऱ्यांची बैठक झाली. पहाटेपर्यंत त्यांची चर्चा सुरू होती. बैठकीत कर्मचार्‍यांनी आजपासून (शनिवार) कामावर रुजू होण्याचे निश्चित झाले. कर्मचार्‍यांच्‍या या निर्णयानुसार शनिवारी पहाटे सहा वाजता चालक, वाहक बसस्थानकामध्ये आले आणि त्‍यांनी सात वाजल्यापासून एसटी सुरू केली. त्यामुळे बसस्थानक पुन्हा प्रवाशाने फुलले आहे. 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here