साखराळे युनिट पूर्ण क्षमतेने प्रतिदिन 7 हजार मेट्रिक टन गाळप करेलं : पी.आर. पाटील

0

साखराळे युनिट पूर्ण क्षमतेने प्रतिदिन 7 हजार मेट्रिक टन गाळप करेलं : पी.आर. पाटील

इस्लामपूर,प्रतिनिधी:आपण गेल्या वर्षी साखराळे युनिटचे आधुनिकीकरण व विस्तारवाढ केल्यानंतर काही तांत्रिक  अडचणी आल्या होत्या. त्या अडचणी पूर्ण करण्यात आल्या असून या गळीत हंगामामध्ये साखराळे युनिट पूर्ण क्षमतेने म्हणजे 7 हजार मेट्रिक टन प्रतिदिन प्रमाणे चालेल,असा विश्वास राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी.आर.पाटील यांनी साखराळे येथे व्यक्त केला. 1 नोव्हेंबरला साखर कारखाना सुरू करण्याची तयारी पूर्ण केली असून निसर्गाने साथ दिल्यास 1 नोव्हेबरला कारखाना सुरू करू,असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

      श्री.पी.आर.पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.रत्नकांता पाटील यांच्या हस्ते साखराळे युनिटमध्ये अग्निची विधिवत पूजा  करून बॉयलर अग्नि प्रदीपन करण्यात आली. याप्रसंगी श्री.पाटील बोलत होते. या समारंभास कारखान्याचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील,सुतगिरणीचे उपाध्यक्ष सुहासकाका पाटील,इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष पै.भगवान पाटील,संचालक जगदीश पाटील,ए.टी.पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Rate Card

     श्री.पाटील पुढे म्हणाले,ऑफ सीझनची सर्व कामे पूर्ण झाली असून साखराळे व वाटेगाव-सुरूल युनिटकडे या गळीत हंगामासाठी 42 हजार एकर ऊसाची नोंद झाली आहे. या युनिटमध्ये या गळीत हंगामामध्ये 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचे कुशल मार्गदर्शन,ऊस उत्पादक शेतकरी,कामगार व ऊस तोडणी मजुरांच्या सहकार्याने हे उद्दिष्ट आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. साखराळे युनिटमधील 28 मेगावट क्षमतेच्या को जनरेशन प्रकल्पामधून गेल्या वर्षी 4 कोटी 52 लाख युनिट वीज निर्मिती केली आहे. त्यातील 2 कोटी 52 लाख वीज निर्यात केली आहे. राज्यातील अनेक साखर कारखान्यांचा शासनाशी वीज खरेदी करार न झाल्याने हे कारखाने अडचणीत आले आहेत. मात्र आ.जयंतराव पाटील यांच्या प्रयत्नातून आपल्या कारखान्याचा वीज खरेदी करार झालेला आहे.

      कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांनी प्रास्ताविक केले. संचालक विठ्ठलतात्या पाटील,कार्तिक पाटील,जालिंदर कांबळे,सौ.सुवर्णा पाटील,माजी प.स.सदस्य दत्तूआप्पा खोत,माजी संचालक माणिकदादा पाटील,बँकेचे संचालक धनाजी पाटील,प्रशांत पाटील,माजी संचालक रसूल लांडगे,माजी उपसभापती सी.व्ही.पाटील,अशोक पाटील येलूर,पोचे गुरुजी,सीताराम हुबालेगुरुजी, साखराळेचे सरपंच बाबुराव पाटील,रघुनाथ साळुंखे,जनरल मॅनेजर एस.डी.कोरडे,सचिव प्रताप पाटील,चीफ केमिस्ट सुनील सावंत,जयंत निबंधे,प्रशांत पाटील,प्रेमनाथ कमलाकर, व्ही. बी. पाटील,डी.एम. पाटील,महेश पाटील यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी,व कामगार उपस्थित होते. चीफ इंजिनिअर विजय मोरे यांनी आभार मानले.

फोटो ओळी- राजारामबापू सह.साखर कारखान्याच्या साखराळे युनिटमध्ये बॉयलर अग्नी प्रदीपन करताना कारखान्याचे चेअरमन पी.आर.पाटील,सौ.रत्नकांता पाटील. समवेत विजयबापू पाटील,जगदीश पाटील, ए.टी.पाटील,विठ्ठलतात्या पाटील,जालिंदर कांबळे, आर.डी.माहुली,दत्तू रतु खोत,माणिकदादा पाटील व मान्यवर.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.