श्रीमती बालिका चव्हाण यांच्या विजयाबद्दल बंडू चव्हाण यांचा सत्कार
श्रीमती बालिका चव्हाण यांच्या विजयाबद्दल बंडू चव्हाण यांचा सत्कार

डफळापूर,वार्ताहर : जत तालुक्यातील डफळापूर येथील ग्रामपंचायत निवडणूकीत श्रींमती बालिका चव्हाण या विजयी झाल्याबद्दल त्याचे चिंरजिव व विजयाचे शिल्पकार बंडू चव्हाण सर यांचा त्यांचे मित्र दहावी 1999 बँचच्या विद्यार्थ्याच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुंच्च देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. डफळापूरच्या प्रथम नागरिक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.तसेच विठ्ठल छत्रे हे ग्रा.पं. सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्याचे चिंरजिव अशोक छत्रे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक खोदानपुरे,सचिन माळी,अॅड. इरशाद खतीब, संदिप पोतदार,विनायक चव्हाण, महानिंग माळी,दादासाहेब चव्हाण, सुनिल चव्हाण, अशोक छत्रे, धनाजी सुतार,गिरधर देवकते,मारूती पवार, दिपक कांबळे, हणमंत कोळी,साहेबराव हताळे,आंनदा शिंदे,काशिनाथ हताळे,सिराज मुजावर,विनायक चव्हाण,सुजित दुगाणे, दत्ताञय माळी,गणेश कुंभार,बापू बेंळूखे,सागर चव्हाण, आदि मान्यवर उपस्थित होते.
