संख भोर नदीत बुडालेला शाळकरी मुलाचा अखेर मृत्तदेह सापडला

0
6

संख भोर नदीत बुडालेला शाळकरी मुलाचा अखेर मृत्तदेह सापडला

संख,वार्ताहर : संख ता.जत येथील भोर नदीत पोहायला गेलेले ज्ञानेश्वर अर्जुन कोळी हा मुलगा गुरुवारी वाहून गेला होता, त्याचा मृत्तदेह अखेर शुक्रवारी संकाळी 11 च्या दरम्यान आढळूंन आला. मृत ज्ञानेश्वर अर्जुन कोळी याला सांगलीतून आलेल्या जीवरक्षक टीमने नदी पात्रातून शोधून काढले. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला घटना गुरूवारी 11.30  वाजता घडलेली होती. गुरूवारी सायंकाळी स्थानिक लोकांनी प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले होते. त्यामुळे जिवरक्षक टिमला प्राचारण करण्यात आले होते. संख परिसरात पाऊस दमदार पडल्याने भोर नदी पाञ भरून वाहत आहे.वाळू तस्करांनी 30 फुटावर खड्डे पाडले आहेत.त्यात पोहण्यासाठी गेलेली मुले वाहू लागली होती. त्यातिल दोघांना वाचविण्यात यश आले होते. तर ज्ञानेश्वरचा शोध लागला नव्हता. पाण्याचा अंदाज नआल्याने ही घटना घडली आहे.घटनास्थळी उपस्थित असलेले सांगली जीवरकक्षचे महंमद तांबोळी,इस्माईल अत्तार,संतोष कुरणे,ञीपाल मद्रासी,संभाजी पाटील यांनी प्रयत्न केले. यावेळी जत नायब तहसिलदार सौदागर नाईक ,व संख तलाठी उदगेरी,उमदीचे सा. पोलिस निरिक्षक उमाकांत शिदे व गावातील काही पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान ज्ञानेश्वरच 8वीच्या वर्गात शिक्षण घेत होता. मनमिळावू असणाऱ्या ज्ञानेश्वरच्या मुत्यूने संख परिसरात शोककळा पसरली आहे. ज्ञानेश्वरचा मृत्तदेह पाहताच त्यांच्या आई-वडीलासह नातेवाईकांनी हांबरडा फोडला होता. उपस्थित नागरिकांनाही अश्रूं अनावर झाले. 

संख भोर नदीत बुडालेला शाळकरी मुलाचा अखेर मृत्तदेह सापडला,मृत्तदेह पाहण्यासाठी जमलेले नागरिक 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here