डफळापूरात समिश्र यश आघाडीचा संरपच : सत्तेच्या चाव्या अपक्षाकडे ; कॉग्रेसचे 9 सदस्य विजयी

0
5

डफळापूरात समिश्र यश 

आघाडीचा संरपच : सत्तेच्या चाव्या अपक्षाकडे ; कॉग्रेसचे 9 सदस्य विजयी

डफळापूर,वार्ताहर : डफळापूर ग्रामपंचायत निवडणूकीत कॉग्रेस, स्थानिक आघाडी व अपक्षाना समिश्र यश मिळाले. अत्यंत अटतटीच्या लढतीत माजी मन्सूर खतीब यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीला संरपच पद राखण्यात यश मिळाले. कॉग्रेसने दिलेली तगडी लढतीला मतदारांनी स्विकारले,त्याचे 9 सदस्य विजयी झाले. मात्र संरपच पदाचा उमेदवार निवडून आला नाही. कॉग्रेसच्या विजयासाठी बाजार समिती सभापती अभिजित चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,सोसायटी चेअरमन मनोहर भोसले यांनी टोकाचे प्रयत्न केले. मात्र त्यांना सत्तेने हुलकावनी दिली.दुसरीकडे आघाडीतून उमेदवारी न मिळाल्याने वार्ड नं. 4 मध्ये अपक्ष पँनेलचे दोन उमेदवार विजयी झाले. पंचायत समिती निवडणूूूकी पासून भाजप पासून वेगळी चुल मांडलेले सज्जनराव चव्हाण यांनी एकट्याच्या बंळावर दोन उमेदवार निवडून आणत हाम भी कम नही हे सिध्द केले. एंकदरीत डफळापूरची ग्रामपंचायतीची संरपच आघाडीचा असला तरी सदस्यामुळे त्रिशूंक स्थिती निर्माण झाली आहे. अपक्ष उमेदवार निर्णयावर ग्रामपंचायतीवर कोणाचे सदस्य सर्वाधिंक होणार हे स्पष्ट होणार आहे. मन्सूर खतीब यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाची सत्ता काढून घेण्यासाठी केलेल्या कॉग्रेेेसच्या प्रयत्नाला मर्यादित यश मिळाले आहे. मात्र 9 उमेदवार निवडून आणत सर्वात मोठा पक्ष कॉग्रेस बनला आहे. अपक्षांना निवडणून आणत सज्जन चव्हाण यांनी किमया साधली आहे. यापुढेही डफळापूर ग्रामपंचायत सत्ताकेंद्र डळमळीत राहणार आहे. आतातरी विकास होणार का? यांचे उत्तर भविष्यात मिळेल. वार्ड 1 मध्ये माजी सदस्य मुरलीधर शिंगे यांचा कस लागला होता त्यात ते यशस्वी झाले ते स्वत:सह पवित्रा हाताळेना निवडून आणण्यात त्यांनी यश मिळविले. मात्र एक जागा त्याच्या हातून गेली.आघाडीचे विठ्ठल छत्रे येथे विजयी झाले,त्यांच्या यशासाठी सुनिल छत्रे यांचे प्रयत्न येथे सफल झाले. वार्ड 2.माजी पंचायत समिती सदस्य सज्जनदादा चव्हाण, उपसंरपच बाळासाहेब पाटील,संभाजी माळी यांच्यावर मतदारांनी पुन्हा विश्वास दाखविला आहे. त्यांचे या वार्डमधील तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.वार्ड 3. कॉग्रेस नेते दत्त  पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी व सोसायटीचे माजी चेअरमन विलास माने यांचे चिंरजिव प्रंशात माने यांच्यामुळे येथील लढत प्रतिष्ठेची झाली. त्यात माळी यांनी बाजी मारत दोनशेवर मतांनी विजय मिळविला. तेथे दुसरे उमेदवार रेश्मा शिंदे यांचे पती जयाजी शिंदे किंगमेकर बनले. दुसरे सदस्य म्हणून सुनिल गायकवाड यांनीही मोठे मताधिक्याने विजय मिळविला.वार्ड 4. विद्यमान उपसंरपच शंकरराव गायकवाड यांच्यामुळे चर्चेत असलेल्या या वार्डात गायकवाड यांना सत्ता राखण्यात अपयश आले. त्यांच्यासह त्यांचे तिन्ही उमेदवार येथे पराभूत झाले. वार्ड.5 उमेदवारी देण्या पासून येथे तगडा संघर्ष झाला. युवक नेते सज्जन चव्हाण यांना विकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी सवता सुभा मांडत अपक्ष तिन उमेदवार उभे केले होते. त्यात त्यांना यश मिळाले त्याचे भाऊ प्रतापराव व जयश्री बोराडे यांना निवडून आणत त्यांनी नेतृत्व सिध्द केले. मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष सुभाषराव गायकवाड यांचे चिंरजिव रमेश गायकवाड यांना येथे निसटता पराभव स्विकारावा लागला. मालन गावडे या आघाडीच्या एक उमेदवार विजयी झाल्या. वार्ड 6.गत निवडणूकीत काठावर पराभूत झालेले ए एन खतीब यांनी गुलाल लावला. दुसरे आघाडीचे उमेदवार मालन गडदे यांना विजयी करत जे.के. माळी यांनी प्रतिष्ठा जपली.संरपच पदाचे उमेदवार बालिका चव्हाण यांच्यासमोर पाणा योजना पुर्ण नागरिकांची पाणी टंचाई दुर करण्याचे मोठे आवाहन असणार आहे. त्याचबरोबर विकास कामे खेचून आणत आश्वासने पुर्ण करण्याची कसरत त्यांना सर्व सदस्याची मोठ बांधून करायची आहे.विजयी उमेदवार असे वार्ड नं. 1 मुरलीधर शिंगे,पवित्रा हाताळे (कॉग्रेस), विठ्ठल छत्रे (आघाडी), वार्ड 2.राहूल पाटील, विजया माळी, सतिशा चव्हाण (आघाडी) वार्ड 3.बाबासो माळी,रेश्मा शिंदे,सुनिल गायकवाड (कॉग्रेस) वार्ड 4.देवदास पाटील, सावित्री दुगाणे, कमल संकपाळ कॉग्रेस वार्ड 5.नंदाताई गावडे (आघाडी) प्रतापराव चव्हाण, जयश्री बोराडे (अपक्ष),वार्ड 6.अजित खतीब कॉग्रेस,मालन गडदे (आघाडी) 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here