वळसंग परिसरातील पवनऊर्जा कंपनीची विद्युत वाहिनी बनली जीवघेणी ; शेतकरी त्रस्त

0
5

वळसंग परिसरातील पवनऊर्जा कंपनीची विद्युत वाहिनी बनली जीवघेणी ; शेतकरी त्रस्त 

वळसंग, वार्ताहर :

वळसंग (ता.जत) येथील भोवतालच्या परिसरात अनेक कंपन्यांच्या नावे पवनचक्क्या स्थित आहेत.  या पवनचक्कीच्या माध्यमातून निर्माण होणारे वीज वाहून नेण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतातून किंवा रस्त्याच्या बाजूने विद्युत वाहिनी मार्गक्रमण करते. अनेक गुंतागुंतीच्या या विद्युत वाहिन्यामुळे अनेक वेळा शॉर्ट सर्किट झालेले आहेत. शेड्याळ-वळसंग हद्दीतील रा.प.म. चे अधिकारी अंकुश सरगर यांच्या शेतलगत सदर एका पवनऊर्जा कंपनीची विद्युत वाहिनी आहे. परंतु सदर वाहिनीच्या तारा ह्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जमिनीपासून 5-6 फुटावर आलेल्या आहेत. आणि सदर भागात जनावरे पाणी पिण्यासाठी ये-जा असते. अती उच्च दाबाच्या 33 के.व्ही. लाईन धोकादायक स्थितित भयानक भीतीचे वातावरण लगतच्या शेतकऱ्यामध्ये तयार झाले आहे. सरगर यांनी वेळोवेळी संबधितांच्या कानावर ठेवले परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या कंपनीच्या विद्युत कंपनीचे अधिकृत अधिकाऱ्यांना सदर प्रकार लक्षात आणून देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. भविष्यात होणाऱ्या हानीची सर्वस्वी जबाबदारी हि संबंधित कंपनी असेल. सदर बाब लक्षात घेऊन लवकरात लवकर विद्युत वाहिनी पुर्वतत उंच करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल अशा इशारा यावेळी सरगर यांनी आमच्या दिले.

वळसंग (ता. जत) येथील पवनऊर्जा कंपनीची धोकादायक बनलेली विद्युत वाहिनी

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here