वळसंगची आदर्श व स्वच्छ शाळा बनली,उकिरडा आणि घाणीघाण

0

वळसंगची आदर्श व स्वच्छ शाळा बनली,उकिरडा आणि घाणीघाण

:

वळसंग, वार्ताहर

वळसंग (ता.जत)येथील जि. प. प्राथमिक शाळा आदर्श शाळेत अस्वच्छता व झुडपे, घाणीचे साम्राज्य साचले आहेत.त्यामुळे शाळेतील लहानग्या मुंलाना धोका निर्माण झाला आहे.

Rate Card

ही एक पंचक्रोशीतील केंद्रस्थानी विराजीत आदर्श आणि स्वच्छ शाळा म्हणून प्रचिलीत आहे. शाळेच्या आवारात सुशोभित झाडे,शिक्षणपद्धती, पटांगण इ. मुळे शाळेच्या शोभे सोबत शिक्षणाच्या ओढीची दरवाजे या शाळेने भक्कम केले होते. पण आज ही शाळा म्हणजे पूर्णतः घाणीचे साम्राज्य आणि विस्कळीत शिक्षण साहित्य निष्कृष्ठ दर्जाच्या सोयी पाहता शाळेच्या गुणवत्तेला बाधक ठरते का काय आणि या अस्वच्छता आणि डबघाईच्या नियोजनावरून प्राथमिक शिक्षण पद्धतीवर असलेला पालकांचा विश्वास कमी होईल का अशी दृढ भीती कायम होत आहे.

शाळेतील प्राथमिक इ. 4 थी पर्यंत एक शिक्षण व्यासपीठ म्हणून या शाळेकडे आजही पहिले जाते परंतु शाळेतील आवार यामध्ये केंद्रप्रमुखाच्या केबिन बाहेर व बाजूला काटेरी झुडपामुळे सरपटणाऱ्या प्राण्याचा धोका निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा नळ चक्क एका लाकडाच्या ओंडक्याने बंद केला गेला आहे.शाळेच्या किचन रूम जवळ पावसाळ्यातील विषारी वनस्पतीची वाढ झाली आहे. शाळेच्या आवारात असलेल्या अंगणवाडीचा रस्ता जणू जंगलातला भासतो,तर शाळेचा महत्वपूर्ण भाग म्हटलं तर स्वछता गृह (मुतारी) ला जाण्यासाठी रस्ता शोधायला चक्क कसरत करावी लागते. दोन दिवसापुर्वी शाळेच्या स्वछता गृह मध्ये साप निघाला होता.त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या पाल्यामध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. अशी गंभीर बाब लक्ष्यात आल्यानंतर गावातील पालक या नात्याने विठ्ठल उर्फ पिंटू बमनाळ, तानाजी चव्हाण, संतोष जाधव व सतीश मुचंडी यांनी सदर बाब शिक्षणअधिकारी यांना 5-6 दिवसांपूर्वी कळवली असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्याच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तातडीने उपाययोजना कराव्यात नाहीत तर ग्रामस्थांच्या वतीने शाळेला टाळे ठोकू असा सज्जड इशारा पालकानी दिला आहे.

वळसंग जिल्हा परिषद शाळेची झालेली स्थिती

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.