तोफा थंडावल्या, आज गुप्त प्रचार

0
9

तोफा थंडावल्या, आज गुप्त प्रचार

जत,वार्ताहर : ग्रामपंचायतीची 

रणधुमाळीच्या तोफा शनिवारी सध्यांकाळीपासून थंडावल्या. टोकाचा व खालच्या पातळीवर गेलेला प्रचार संपला,आज गुप्त प्रचार होणार आहे. शनिवार व रविवारची रात्र उमेदवार,व त्यांचे नेत्यांनी जागता पाहरा ठेवला आहे. आर्थिक आमिषे दाखून मते फुटतील या भितीने सर्वच उमेदवारांनी टाईट फिल्डिंग लावली आहे.दरम्यान शनिवारी सध्यांकाळीपासून तालुक्यातील काही गावात सततधार पाऊसाने प्रचार करणाऱ्यां उमेदवाराची दाणादाण उडविली. सायंकाळी पाच पासून धुवाधार पावस रात्री उशिरापर्यत सुरू होता. दुसरीकडे टोकाच्या प्रचारामुळे विकृत्त प्रवृत्तीला गेलेल्या प्रचारामुळे काही गावात वादाचे प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. पश्चिम भागातील बाज,बेंळूखी,डफळापूर,तर येळवी,जाड्डरबोबलाद,संखसह पुर्व भागातील सर्वच गावात कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here