क्षारयुक्त पाण्याने बळावतोय दंतक्षयासह विविध आजार आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष : डफळापूर सह पश्चिम भागातील नागरिक हैराण, शुद्ध पाणीपुरवठा केव्हा?

0
Post Views : 1 view

क्षारयुक्त पाण्याने बळावतोय दंतक्षयासह विविध आजार


आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष : डफळापूर सह पश्चिम 

भागातील नागरिक हैराण, शुद्ध पाणीपुरवठा केव्हा?

जत,काा. प्रतिनिधी : स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही शुद्ध पाण्याची व्यवस्था ग्रामीण भागात नाही किंवा नमुने तपासणी होत नसल्याने ग्रामस्थांना अशुध्द पाणी प्यावे लागते, हे वास्तव आहे. तालुक्यातील  गावातील नदी-नाले आटले की बोअर किंवा विहिरीचेच पाणी प्यावे लागते. परंतु हे क्षारयुक्त पाणी प्यायल्याने गावकर्‍यांचे आयुष्यच काळवंडले आहे. दातांच्या तक्रारीदेखील वाढल्या असून कमरेचे व गुडघ्याचे आजारही जडले आहेत. मात्र, याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची खंत गावातील नागरिकांनी व्यक्त केली.
जत पश्चिम भागातील

Rate Card

ग्रामस्थ शेती, मोलमजुरी करुन उपजीविका करतात. जवळपास 70 हाजार लोकसंख्या जत पश्चिम भागातील खलाटी,जिरग्याळ, मिरवाड, शिंगणापूर, कुडणूर,डफळापूर, बाज,बेंळूखी, अंकले,वाषाण,कंठी,डोर्ली या गावात वसली आहे. या गावातील ग्रामस्थांना शुध्दीकरणाची प्रक्रिया न करताच पाणी पुरवठा केला जातो. अनेक दिवसांपासून क्षारयुक्त पाणी प्यावे लागत असल्याने संपूर्ण गावालाच विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
‘रिमुव्हल प्लांट’ लावणे गरजेचे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने फ्लोराईड युक्त पाण्याचा शोध घेऊन या पाण्याचा स्त्रोत असलेल्या गावात रिमुव्हल प्लांट लावण्याची गरज आहे.

अशुध्द पाणी पिल्याने दंतरोगांसह अनेक आजाराता सामना करावा लागत आहे. 99 टक्के ग्रामस्थांना दातांचे आजार जडले आहेत.
क्षारयुक्त पाण्यामुळे सांधेदुखी, दातांचे आजार, हाडे ठिसूळ होणे यातूनच अनेक आजारांना तोंड द्यावे लागते. हे पाणी वापरल्याने दात पडण्याची प्रक्रिया लवकर होते तर हाडे ठिसूळ होवून हाडांची वाढ खुंटते. आणि सांधेदुखीसारखे आजार होऊन दुखणे वाढते . गर्भवती महिला किंवा नवजात बालकांवरसुध्दा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. महिन्याकाठी पाणी नमुने घेऊन प्रयोगशाळेत तज्ज्ञांकडून तपासणी करणे आवश्यक आहे. असे वैद्यकीय क्षेत्रातील 

तज्ञ्याचे मत आहे.
निवडणूक आली की राजकीय मंडळी गावाला भेट देऊन विविध आश्‍वासने देतात. परंतु अशुध्द पाण्याच्या समस्येबाबत मात्र गावकर्‍यांची अनास्था दिसून येत आहे. केवळ रस्ते, नाल्यांचे जाळे पसरवण्यातच लोकप्रतिनिधी धन्यता मानतात. असतात. पाणी टंचाई वा गावकर्‍यांचे आरोग्य याकडे मात्रसाफ दुर्लक्ष होत असल्याचे गावकर्‍यांचे म्हणणे आहे. गोडे पाणी मिळणार तरी कधी ? गावाजवळून वाहणार्‍या नदी-नाल्यांना पाणी असते तोपर्यंत गावकर्‍यांना गोडे पाणी मिळते. मात्र, नदी-नाले आटल्यानंतर या गावकर्‍यांना क्षारयुक्त पाणी प्यावे लागते. या गावांना गोड्या पाण्याचा नियमित पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.