जत शहरातील कृषी औषधांच्या गोडावूनला आग,दोन लाखाचे नुकसान

0

जत शहरातील कृषी औषधांच्या गोडावूनला आग,दोन लाखाचे नुकसान

जत,प्रतिनिधी : जत शहरातून जाणाऱ्या विजापूर ते गुहागर राज्य मार्गालगत असलेल्या खत गोदामाला अचानक आग लागून सुमारे दोन लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.ही घटना शुक्रवारी सायंकाळी  साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली. दरम्यान घटनेची नोंद रात्री उशिरापर्यत जत पोलिसात दाखल नव्हती.अधिक माहिती अशी की, जत बाजार समिती व्यापारी संकुलात आप्पू निलजगी यांचे मल्लिकार्जुन कृषी सेवा केंद्र आहे. खाली दुकान व वरील मजल्यावर गोदाम आहे.शुक्रवारी सायंकाळी अचानक गोदामाला आग लागली.आगीत गोडावून मधील संपूर्ण माल जळून भस्मसात झाला आहेे.आग नेमकी कशामुळे लागली त्याचे कारण समजू शकले नाही. नागरिकांनी पाणी मारुन आग 

आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

Rate Card

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.